पोस्टाची सुकन्या साथी योजना राबविण्यात भाऊसाहेब जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

अहमदनगर(प्रतिनिधी) आगडगाव येथील भाऊसाहेब विठोबा जाधव यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुकन्या साथी योजना प्रभावीपणे राबविली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अहमदनगर प्रधान डाक कार्यालयाचे प्रवर अधीक्षक एस रामकृष्णन यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन पारितोषिक प्रदान करन गौरविण्यात आले. जाधव यांनी सुकन्या साथी योजनेचे महत्त्व पटवुन देत सर्वसामान्य जनतेपर्यंत जाऊन या योजनेचा दिला लाभ आहे. तब्बल 125 सुकन्या खाते उघडून त्यांनी जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. यावेळी डाक प्रवर अधीक्षक एस रामकृष्णन यांनी जाधव यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. जाधव यांच्या कार्याबद्दल सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे. 
यावेळी प्रवर अधीक्षक एस रामकृष्णन, हादगल साहेब, घोडके साहेब, बनकर साहेब, सोनवणे साहेब, संदीप कोकाटे साहेब, तसेच सहाय्यक डाक निरीक्षक आणि अहमदनगर हेड पोष्ट ऑफिसमधील सर्व कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post