ज्ञानाचा मुख्य स्त्रोत म्हणून पुस्तकाचे महत्त्व टिकून -प्राचार्य डॉ. बी.एच. झावरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पुणे विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार प्राप्त कर्मचारी संतोष कानडे यांनी न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयात (स्वायत्त) राष्ट्रीय सेवा योजना विभागाने नव्याने सुरू केलेल्या ग्रंथालयास राष्ट्रपुरुषांचे चरित्रपर पुस्तकांची भेट दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एच. झावरे, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, डॉ. अनिल आठरे, डॉ. संजय कळमकर, प्रबंधक बबन साबळे, गणित विभाग प्रमुख डॉ. एस.बी. गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश निमसे, प्रा.डॉ.सुनिता मोटे, प्रा.भगवान कुंभार, अशोक कदम, वैभव घोडके, संजय शिंदे, बाबासाहेब मुर्तडक, संतोष बुगे आदी उपस्थित होते.
महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. बी.एच. झावरे म्हणाले की, मानवी जीवनातील अनमोल व कायमस्वरूपी टिकून राहणारी संपत्ती म्हणजे ज्ञान होय. ज्ञानाचा मुख्य स्त्रोत म्हणून पुस्तकाचे महत्त्व टिकून आहे. मनुष्याला सुसंस्कृत बनविण्याकरीता राष्ट्रपुरुषांचे विचार पथदर्शी असून, ते विचार पुस्तकांच्या माध्यमातून भावी पिढीत रुजणार असल्याचे त्यांनी सांगितले. संतोष कानडे व अशोक कदम यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.
Post a Comment