सातवा वेतन आयोगाच्या फरकाचा हप्ता त्वरित द्यावा - सुनिल गाडगे

नगर(प्रतिनिधी)नगर जिल्ह्यातील माध्यमिक व उच्चमाध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचासातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता शासन आदेशाप्रमाणे तात्काळ  जमा करावा, या मागणीसाठी नगर जिल्हा माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी व वेतन पथकअधीक्षकांना  शिक्षक भारती संघटनेने निवेदन दिले आहे. घड्याळी
तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे वेतन, वैद्यकीय बिल, थकबाकी बिले त्वरित अदा  करा, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मंजूर झालेले  भविष्य निर्वाह निधीचे हक्काचे पैसे तात्काळ अदा करा अन्यथा शिक्षक भारती आंदोलन करेल , असे प्रतिपादन  शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव   सुनिल गाडगे  यांनी सांगीतले.
      वेतन पथक माध्यमिककडून निधी नाही, असे वारंवार उत्तर दिले जाते. निधी उपलब्ध करणे, निधीची मागणी करणे, योग्य वेळी नियोजन न झाल्यामुळेच शिक्षकांना वेतनापासून वंचित रहावे लागते, अशी तीव्र भावना जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे वेतन पथकाकडून त्वरित सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता त्वरित मिळावा, राष्ट्रीय निवृत्ती योजनेचा हिशेब त्वरित द्यावा या व इतर  विविध मागण्या प्रलंबित आहे, त्या पूर्ण करण्यासाठी  शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य  सचिव सुनिल गाडगे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप,  मोहमंद समी शेख. जिल्हा महिला अध्यक्षा आशा मगर.समन्वयक योगेश हराळे.उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु , उच्च माध्यमिकचे जिल्हा सचिव महेश पाडेकर. जिल्हा माध्यमिकचे  सचिव विजय कराळे , कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे. संभाजी पवार,हनुमंत  रायकर , नवनाथ घोरपडे . काशीनाथ मते .सुदाम दिघे, संजय पवार. संतोष देशमुख . किसन सोनवणे.संजय तमनर .  कैलास जाधव. संतोष शेंदुरकर, जिल्हा कार्यवाह संजय भूसारी. जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर शेख .रेवन घंगाळे. जॉन सोनवणे .महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर सचिव विभावरी रोकडे कार्याध्यक्ष मिनाक्षी सूर्यवंशी. रोहिणी भोर .शकुंतला वाळुंज, छाया लष्करे. जया गागरे. रूपाली बोरूडे, रूपाली कुरूमकर आदींनी आंदोलनाची माहिती दिली आहे .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post