माणूसपण जपलेले नेतृत्व माजी मंत्री प्रा. राम शिंदे

    चौंडी (प्रतिनिधी)     .१/०१/२०२२  . प्रा  राम शिंदे साहेब यांचा वाढदिवस .... प्रथमतः  राम शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या उदंड आयुष्यासाठी अनंत हार्दिक शिव शुभेच्छा.....
          नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व असा तिहेरी संगम असणारे आणि माणूसपण जीवंत असलेले आणि जपलेले.. नेतृत्व .. श्री शिंदे साहेब.....……...............
    हो,मुद्दामहुन नेतृत्वचं म्हटलं कारण राजकीय जीवन आणि त्याबाहेरही या व्यक्तिचे अवलोकन करताना राजकीय नेते पण आहेच पण त्याही पेक्षा नेतृत्व म्हणून त्याचं वेगळपणं ठसठसीत पणे पुढे येते ...............
        राजकारणात ढोबळमानाने आपल्यापेक्षा ज्येष्ठ आणि तुलनेने संघटनेत वरचढ पदे मिळाली म्हणून ते नेतृत्व असे मानण्याचा एक सोपा ठोकताळा आहे आणि व्यवहारी जगाच्या दृष्टीने तो बहुतांशी वेळेस यथायोग्य ही मानला जातो ...... स्वार्थी हेतूने व्यवहारी जगाने ती केलेली एक तडजोड असते ....
         मा.श्री .राम शिंदे हे नेतृत्व म्हणून याबाबतीत खरंच खूपच वेगळे ठरतात . त्यांच्या राजकीय जीवनाचा आलेख तर हा नेहमी उंचावतच गेलेला आहे . ज्यावेळेस हा आलेख उंच जात असतो त्यावेळेस आपली मुळे घट्ट पकडून ठेवण्याचे कसब व्यक्तिकडे असेल तरच त्याचा भरकटणारा पतंग होत नाही ... कठिण प्रसंगीच माणसाच्या अशा गुणांची ओळख होत असते ... मा . शिंदे साहेब अशा कठिण प्रसंगातून अनेकवेळा लिलया पार गेलेले आहेत .........
         त्यांच्या नेतृत्वगुणाचा कस लागण्याचा प्रसंग मी जवळून अनुभवलेला आहे . . . . .
        विधानसभेच्या पराभवानंतरच्या पार्श्वभूमीवर येणारी सार्वजनिक निवडणूक म्हणजे कर्जत नगर पंचायतची निवडणूक होय ..
खरं तर या निवडणुकी मध्ये भाजप आणि शिंदे साहेब यांच्या दृष्टीने फक्त अपरिहार्यता होती .. त्याला कारणेही बरीच होती ......
       ज्यांच्या पाठीवर हात ठेऊन ' लढं, मी तुझ्या पाठीशी आहे. ' असं म्हणून ज्यांच्यावर विश्वास टाकला होता ते सर्व सहकारी एक एक करून सोडून गेलेले किंवा नाइलाजाने समोरील गोटात सामील झालेले, समोर सत्ता सुंदरी, पैसा, कार्पोरेट मार्केटिंग, घराण्याचे नाव आणि दिमतीला पगारी मिडिया........
             शिंदे साहेबांकडे मुळात मुद्दलातच खोट होती तर लढणार काय? परंतु नेतृत्व म्हणून शिंदे साहेब याच ठिकाणी वेगळे ठरतात . अगदी तुटपुंज्या साधना निशी व अपुऱ्या मनुष्य बळाअभावीची ही लढाई अगदी "मैदानात ही नसण्यापासून तर विजयी घोडदौडीकडे " अशा मार्गावर आणली ती केवळ स्वतःच्या विश्वासावर व नेतृत्व म्हणून ..........
                हि निवडणूक विकासाच्या मुद्दया पासून बाजूला घेऊन जायची कारण विकास या मुद्दयावर आपला टिकाव लागणार नाही हे विरोधक ओळखून होते कारण विकास केला नाही म्हणावे तर विद्यमान नगर पंचायत पदाधिकारी जे त्यांच्या गोटात सामिल झाले आहेत त्यांच्यावर बोट ठेवले जाईल आणि विकास केला म्हणावा तर श्रेय श्री शिंदे साहेबांना जाईल . म्हणून त्या निवडणुकीत अगदी राष्ट्रीय राजकीय नेते आणायचे आणि हि निवडणूक विकास या मुद्दयावर होऊच द्यायची नाही अशी रणनीती समोरून असताना..
           चाणाक्ष श्री शिंदे साहेब यांनी हि गोष्ट हेरली आणि त्यांनी प्रथम पासूनच व्यूहरचना करून अन्याया विरोधातील सद्गुरुंच्या दारातील मौन आंदोलन, मूकमोर्चा, या माध्यमातून ही लढाई स्वतःच्या अस्तित्वाची किंवा प्रतिष्ठेची होऊ न देता ती कर्जतकरांच्या स्वाभिमानाची करून पुन्हा कर्जतकरांच्या अंगणात विकासाच्या मुद्दयावर आणून ठेवण्यात ते यशस्वी झाले इथेच त्यांच्यातील वेगळेपण आणि नेतृत्व गुण अधोरेखीत होतात.....
                   नेतृत्व म्हणजे स्वतः आघाडीवर राहून लढणे आणि त्याच बरोबर सहकार्याना विश्वास देऊन योग्य मार्गावर घेऊन जाणे असते ... छोट्यातील छोटा कार्यकर्ता असो त्याच्या बरोबर अगदी प्रेमाने,त्याचा आदब जपत, त्याला त्याच्या मनाप्रमाणे खुलवत त्याला आत्मविश्वास देणे . अशा गोष्टी श्री शिंदे साहेब अगदी लिलया करतात त्यामुळेच......
               मा.प्रा.राम शिंदे साहेब माणूसपण जपलेलं नेतृत्व आहेत असं म्हणतो .
              माळढोक पक्षी अभयारण्य जमिन अधिग्रहण झोन हटवणे असो, कुकडी चारी साठी अधिग्रहीत जमिनींचा मोबदला व अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी तत्कालीन सरकारमध्ये३९०० कोटीची प्रशासकीय मान्यता मिळवणे असो, जलयुक्त मधून तर हजारो कोटींचा निधी आणून जवळजवळ दुष्काळी तालुका ही ओळख पुसण्यासाठीचे भगीरथ प्रयत्न असो, हायब्रीड अॅन्युटी, मुख्यमंत्री सडक, जिल्हा नियोजन मधून निधी अशा विविध योजना मधून तालुक्यातील रस्ते सुधार असो . त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटलेला आहे .... आज मतदार संघात बहुतांशी ठिकाणी रस्ते करण्यासाठी साइट उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती आहे . . . .
        जिल्हा नियोजनचा निधी मोठ्या प्रमाणात तालुक्यासाठी उपलब्ध करण्यात ते यशस्वी ठरले आहेत . देवस्थानांना " क " वर्ग दर्जा देणे असो, त्या "क" वर्ग दर्जा प्राप्त देवस्थानांना निधी, महिलांच्या बचत गटासाठी नाविण्य पूर्ण योजनेत निधी उपलब्ध करणे असो, अंगणवाडी बांधकामांना निधी उपलब्धतेबाबतही जि . प . कडे तो वर्ग करणे असो, जिल्हा नियोजन अंतर्गत ट्रान्सफॉर्मरसाठी(डीपी) निधी असो . असा विविध योजनांमार्फत तालुक्यात विकासाचा अनुशेष हटविण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे ...
             प्राथमिक आरोग्य केंद्रांना केंद्र सरकारचा निधी उपलब्ध करणे असो कि शाळेतील मुलांना विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून शुद्ध पाणी साठी फिल्टर्स, डिजिटल क्लासरूम करणे असो असा त्यांचा नेहमीच जागरूक दृष्टिकोन राहिलेला आहे . . . . .
            शेतकयांना पूर्ण दाबाने आणि क्षमतेनं वीज मिळण्यासाठी ३३ केव्ही चे सबस्टेशन तालुक्यात बऱ्याच ठिकाणी निर्मिती करण्यात आले त्याचप्रमाणे वाढीव वीजेसाठी ४४० केव्ही चे सबस्टेशन उभारणी करण्यातही ते यशस्वी झाले ....
               ग्रा पं . चे नगरपंचायत मध्ये रुपांतर करून जवळजवळ १५१ कोटीचा निधी उपलब्ध करुन कर्जत शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम असो कि कर्जत चे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असो ते मिटवण्याचे काम श्री शिंदे साहेबांनी यशस्वीपणे केले आहे .
          कृषी महाविद्यालय, रस्ते, पाणी पुरवठा योजना, विविध विकासकामे ही काही वानगीदाखल उदाहरणे त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतात ....
              कोणीही असो त्याच्या अडचणीत मदत करण्यासाठी शिंदे साहेब नेहमीच अग्रेसर राहिले आहेत .. पत्रकार रायकर यांच्या कुटुंबाला व्यक्तिगत मदत करणे असो किंवा कोरोना काळात कित्येक कार्यकर्त्यांच्या मार्फत औषधे उपलब्ध करणे असो हे त्यांनी कोणताही गाजावाजा न करता केलेले आहे . हे दार्तृत्व त्यांच्या ठायी आहे . . . . . .
             कोणत्याही माणसा बरोबर दिलखुलासपणे गप्पा करत, आस्थेवाइक चौकशी करत त्याच्या अडचणी जाणून घेणे, त्याच्या नकळत त्याला मदत करणे असं माणूसपण जपलेले व्यक्तिमत्व म्हणून श्री शिंदे सर माणूसपण जपणारे नेतृत्व आहेत ....
       खऱ्या अर्थाने नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व याचा तिहेरी संगम असणाऱ्या मा श्री शिंदे साहेब यांना या वाढदिवसानिमित्त दीर्घायु व उत्तम आरोग्य लाभो हिच सदिच्छा.....
                 शुभेच्छुक
        *श्री पाडुरंग माने, श्री शेखर खरमरे*
*शब्दांकन : श्री शेखर खरमरे( तालुकाध्यक्ष, सोशल मिडिया, भाजप कर्जत)*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post