चौंडी सरपंच ते मंत्री" हा राजकीय क्षितिजावर सर्वांना थक्क करून टाकणारा प्रवास

माजी मंत्री  प्रा.राम शंकर शिंदे ..एका सर्वसामान्य धनगर कुटुंबात चौंडी ता.जामखेड जि.अहमदनगर या गांवी दि.01 जानेवारी 1969 रोजी जन्मलेलं व्यक्तीमत्व..घरची परिस्थिती बेताचीच असल्याने प्राथमिक शिक्षण त्यांच्या आजोळी अर्थात पोथरे ता.करमाळा जि.सोलापुर येथे पुर्ण झाल्यानंतर प्रचंड हलाखीतचं साहेबांनी पुढील विद्यालयीन, महाविद्यालयीन शिक्षण जिद्दीने पुर्ण करत M.Sc.B.ed ही शैक्षणिक अहर्ता पुर्ण केली..दरम्यानच्या काळात साहेबांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून PSI ही परीक्षा देऊन आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्नही केला..तद्नंतर साहेबांनी आष्टी जि.बीड येथील आर्ट अँड सायन्स महाविद्यालयात प्राध्यापक म्हणुन नोकरी स्वीकारली..आणि अल्पावधीतचं एक यशस्वी प्राध्यापक म्हणुन नावलौकीक मिळवला..त्यांचे अध्यापन प्रचंड अभ्यासपुर्ण असायचे अशी आठवण त्यांचे तत्कालीन विद्यार्थी आजही अभिमानाने सांगतात..साहेब प्राध्यापक झाल्याचा आनंद त्यांना आणि त्यांच्या आई-वडीलांनाही झाला होता..अशातच तत्कालीन ग्रामविकास मंत्री आदरणीय आण्णासाहेब डांगे हे अहिल्याईंच्या गौरवशाली इतिहासाने प्रभावित होऊन अहिल्याईंच्या जन्मगांवी अर्थात चौंडी येथे आले आणि त्यांनी या दुर्लक्षित ऐतिहासिक गावाचा अपेक्षित विकास करण्याचा महत्वपुर्ण संकल्प केला..गावातील समाज बांधवांशी चर्चा करताना आदरणीय आण्णासाहेब डांगेंना राम शिंदे साहेबांबद्दल माहिती मिळाली..उच्चविद्या विभुषित राम शिंदे साहेब हे व्यक्तीमत्व तत्कालीन ग्रामविकास मंत्री आदरणीय डांगे साहेबांना चौंडीचा अपेक्षित विकास करण्याच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण वाटले आणि त्यांनी राम शिंदे साहेबांना चौंडी विकास प्रक्रियेत समाविष्ट करून घेतले..आदरणीय आण्णासाहेब डांगे यांनी राम शिंदे साहेबांची महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक पदी नियुक्ती करुन त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीमय कार्यास चालना दिली..महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या माध्यमातुन अनेक विकास कामे चौंडीत सुरु झाली..चौंडीचा अपेक्षित विकास करण्यासाठी शिंदे साहेबांनी चौंडीची ग्रामपंचायत लढवली आणि चौंडीचे सरपंच म्हणुन आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली..दरम्यानच्या काळात साहेबांनी सामाजिक बांधिलकीमय समाजकारण आणि राजकारणासाठी 1997 साली आपल्या प्राध्यापक पदाचा त्याग करत पुर्णवेळ समाजकारणमय राजकारणात स्वत:ला झोकुन दिले..साहेबांचा स्थानिक राजकारणातील प्रवेश प्रस्थापित राजकारण्यांना रुचला नाही..परंतु तत्कालीन ग्रामविकास मंत्री आदरणीय डांगे साहेब यांचा वरदहस्त असल्याने आणि स्वत: राम शिंदे साहेबांच्या अजातशत्रु व्यक्तीमत्वामुळे साहेब स्थानिक राजकारणात यशस्वी झाले..पुढे युतीचे सरकार गेले..नवीन सरकार सत्तारुढ झाले..चौंडीतील विकास कामेही ठप्प झाली..आणि पक्षश्रेष्ठीशी मतभेद झाल्याने आण्णासाहेब डांगेंनी पक्षांतर केले..साहजिकच राम शिंदे साहेबांवरही पक्षांतरासाठी दबाव होता..परंतु साहेबांनी भाजपाशी एकनिष्ठ राहत त्या प्रतिकुल काळातही पक्षासाठीच काम केले..तद्नंतर राम शिंदे साहेबांनी पत्नी आशाताईंच्या माध्यमातुन जामखेड पंचायत समिती सदस्य पदाची निवडणुक लढवली आणि साहेबांच्या पत्नी अर्थात आशाताई राम शिंदे विजयी झाल्या..पक्ष बांधिलकी, सर्वांशी मित्रत्वाचे संबंध या शिंदे साहेबांच्या व्यक्तीगत भांडवलावर साहेबांच्या पत्नी आशाताई जामखेड पंचायत समितीच्या सभापती बनल्या..आणि साहेबांच्या राजकीय महत्वाकांक्षा पल्लवीत झाल्या..आशाताईंच्या सभापती पदाच्या माध्यमातुन राम शिंदे साहेबांनी प्रचंड जनसंपर्क वाढविला..तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यास प्राधान्य देत सर्वांशी स्नेहाचे आणि आपुलकीचे संबंध प्रस्थापित केले..तालुक्यातील सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला..
     2009 ला विधानसभेची निवडणुक घोषित झाली..अपेक्षेप्रमाणे आरक्षित असलेला जामखेड-कर्जत विधानसभा मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला..आणि मतदार संघात मातब्बर प्रस्थापित उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधुन निवडणुकीसाठी तयार झाले..या मतदारसंघात गेली तीन वेळा भाजपाचा उमेदवार विजयी झालेला असल्याने भाजपच्या तिकीटासाठीही पक्षश्रेष्ठींकडे प्रस्थापितांचे लॉबींग सुरु झाले..परंतु पक्षश्रेष्ठींनी पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या राम शिंदे साहेबांनाच आपला उमेदवार म्हणुन घोषित केले..प्रचार सुरु झाला.."नेता नव्हे कार्यकर्ता, राम शिंदे सर्वांकरता" ही लक्षवेधक आणि प्रचंड आपुलकीची घोषणा देत राम शिंदे साहेब निवडणुकीच्या मैदानात उतरले..प्रतिस्पर्धी उमेदवारांवर कुठल्याही प्रकारची टीका-टिपण्णी न करता केवळ मतदार संघातील मूलभूत प्रश्नांना 'हायलाईट' करणारे साहेब मतदारांना आपलेसे वाटले आणि आदरणीय प्रा.राम शिंदे साहेब 'आमदार' झाले..साहेबांनी हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया देत आपल्या आगामी सर्वाभिमुख राजकारणाचे संकेत दिले..अहिल्यामाईंचे नववे वंशज असलेले राम शिंदे साहेब आमदार बनले..सर्वसामान्य धनगर कुटुंबातील सर्वसामान्य व्यक्तीमत्व आमदार बनलं..आणि साहेबांनी आपली आमदारकी मतदार संघातील सर्वसामान्य जनतेसाठी समर्पित करत मतदारसंघाचा विकास करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला..साहेब विरोधी पक्षाचे आमदार असल्याने त्यांना मतदारसंघाचा अपेक्षित विकास करण्यास मर्यादा जाणवत होत्या..साहेबांच्या मतदारसंघात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता..साहेबांनी आंदोलनाचे हत्यार उपसले..शेतकऱ्यांना पाणी मिळावे म्हणुन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारे ते एकमेवाद्वितीय आमदार ठरले..साहेबांच्या आंदोलनामुळे पाणी तर मिळालेच..परंतु मतदार संघात बऱ्याच ठिकाणी जनावरांसाठी चारा छावण्याही सुरु झाल्या..आपल्या आमदार निधीतुन आवश्यकता प्राधान्यक्रमाने साहेबांनी कोणताही भेदभाव न करता रस्ते, सभागृह, प्रवासी निवारे, सभामंडम यांसारखी कामे करत जनताभिमुख राजकारण केले..मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखाच्या सर्व प्रसंगात उपस्थित राहणारा, जनतेच्या संकटांत धावुन जाणारा हा नेता अल्पावधीतचं सर्वांच्या गळ्यातील ताईत बनला..साहेबांनी सर्वांना सोबत घेत आपले व्यक्तीमत्व अजातशत्रु बनविले..आपल्या उत्तम वक्तृत्वाने विधानसभाही गाजवली..
      2014 साल उजाडले आणि विधानसभा निवडणुकीचे बिगुल पुन्हा वाजले..मतदार संघाचा विकास, पाणीप्रश्नासाठी केलेली आंदोलने, सर्वसामान्य मतदारांसोबत थेट संपर्क यांमुळे या निवडणुकीत शिंदे साहेबांचाच बोलबाला राहणार हे सुरवातीपासुनच जाणवत होते..त्यातच ऐन निवडणुकीदरम्यान प्रतिस्पर्धी पक्षांचे मोठे पदाधिकारी साहेबांच्या मितभाषी आणि अजातशत्रु व्यक्तीमत्वाने साहेबांसमवेत आल्याने साहेब प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाले..साहेब पुन्हा आमदार झाले..साहेबांचा पक्ष विधानसभेतील सर्वांत मोठा आणि सत्तेचा प्रबळ दावेदार असणारा पक्ष झाला आणि चर्चा सुरु झाली ती साहेबांच्या मंत्रीपदाची..
       नवीन सरकार सत्तारुढ झाले..अपेक्षित असूनही मंत्रीमंडळाच्या पहिल्या फेरीत साहेबांना मंत्रीपदाने चकवा दिला..दि. 5 डिसेंबर 2014..मंत्रीमंडळ विस्तार..आणि अखेर तो क्षण आला..आदरणीय प्रा.राम शिंदे साहेबांनी राज्यमंत्री म्हणुन शपथ घेतली..सर्वसामान्यांचा प्रतिनिधी 'नामदार' बनला..प्रजावत्सल राज्यकर्ती अहिल्यामाईंचे नववे वंशज प्रा.राम शंकर शिंदे खऱ्या अर्थाने राज्यकर्ते बनले..त्यांच्या ह्या राज्याभिषेकास अर्थात शपथविधी सोहळ्यास मतदारसंघासह संपुर्ण महाराष्ट्रातुन त्यांचे नातेवाईक, कार्यकर्ते, चाहते यांनी लक्षवेधक गर्दी केली होती..कधी काळी PSI ची परीक्षा देऊन PSI होण्याचे स्वप्न पाहिलेले राम शिंदे साहेब आज गृहराज्यमंत्री बनून हजारो PSI चे 'बॉस' झाले होते..प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपला माणूस "नामदार" झाल्याचे समाधान जाणवत होते..साहेबांचा "चौंडी सरपंच ते मंत्री" हा राजकीय क्षितिजावर सर्वांना थक्क करून टाकणारा प्रवास..
    अहिल्यामाईंचे वारस राज्यकर्ता बनले आणि पदोपदी अहिल्यामाईंच्या प्रजावत्सल राज्यकारभाराची आठवण करून देणारा राज्यकारभार साहेबांच्या हातुन सुरु झाला..अहिल्यामाईंच्या प्रजावत्सल राज्यकारभाराचे आधुनिक प्रात्यक्षिक म्हणजे आदरणीय नामदार प्रा.राम शिंदे यांची सुरु असलेली मंत्रीपदाची कारकिर्द..साहेबांकडे कसलीही समस्या घेऊन त्यांच्या संपर्कात आलेला कुणीही व्यक्ती जाताना चेहऱ्यावर प्रचंड समाधानाचे भाव घेऊन जातो..अनेकांवरचा अन्याय दूर करून त्यांना अपेक्षित न्याय देण्याचे काम अहिल्याईंचा वंशज म्हणुन साहेबांनी कर्तव्यपरायणतेने पुर्ण केले आहे..ना कुणी मध्यस्थ, ना कुणाची शिफारस..जनतेला थेट साहेबांपर्यंत विना अडथळा प्रवेश..साहेबांची कार्यपद्धतीही जनताकेंद्रित असल्याने साहेबांच्या रूपात जनता अहिल्याईंच्या प्रजावत्सल राज्यकारभाराचा प्रत्यक्ष अनुभव घेत असल्याचे चित्र पदोपदी जाणवत आहे..एकंदरीत "राज्यकर्ता असावा तर असा.."असा सूर जनतेतुन निघत आहे.माजी  मंत्री  प्रा.राम शिंदे  भारतीय जनता पक्षाच्या  सरकार मध्ये सर्वाधिक तब्बल १४ खाते सांभाळून यशस्वी प्रजावत्सल राज्यकारभारामुळे राज्यात नावलौकिक प्राप्त केलेले एकमेव मंत्री होते.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील सदस्य उभा असल्याने निसटता पराभव झाला तरी   खचून न जाता पुन्हा उभारी घेतली.भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्ष म्हणून राज्यभर स्टार प्रचाराक म्हणून जबाबदारी स्वीकारली. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात उमेदवारी सर्व्ह मध्ये नाव असतानाही पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. विधानपरिषद असो किंवा प्रदेशाध्यक्ष म्हणून नाव चर्चेत आले मात्र त्याहूनही मोठे पद मिळो हीच वाढदिवसानिमित्त  मनपुर्वक शुभेच्या

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post