भाजप पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या वाढदिवसानिमित्त पांजरपोळ येथे चारा वाटप



सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या पक्ष धोरणामुळे जे.पी.नड्डा यांनी पक्ष सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवला - भैय्या गंधे

    नगर - संघ स्वयंसेवक ते भारतातील सर्वात मोठ्या पक्षाचा अध्यक्ष असा विलक्षण प्रवास व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने सहकारी व कुशल संघटक म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे नाव पुढे येते. संघाच्या तालमीत तयार होऊन त्यांनी भाजपा पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळेच त्यांना भाजपाचे सर्वोच्च अशा अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याने देशात पक्षाचे कार्य वाढविले. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने अनेक राज्यातील निवडणुकीत चांगले यश मिळविले. त्यामुळे भाजपाशी अनेकजण जोडले गेले आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्याचे पक्षाच्या धोरणामुळे पक्ष सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे. भाजपाप्रणित केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी करावे. त्या माध्यमातून पक्षाची ध्येय धोरणे जनमाणसात पोहचवून पक्ष आणखी मजबूत करावा, हीच राष्ट्रीय अध्यक्षांना वाढदिवसाची भेट असेल, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले.

    भारतीय जनता पार्टीचे जे.पी.नड्डा यांच्या वाढदिवसानिमित्त नगर शहर जिल्हा भाजपाच्यावतीने पांजरपोळ येथे चारा वाटप करण्यात आला. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, सरचिटणीस अ‍ॅड.विवेक नाईक, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, तुषार पोटे, अजय चितळे, वसंत राठोड, सचिन पारखी, संजय ढोणे, डॉ.ज्ञानेश्वर दराडे, शिवाजी दहिंडे, बाळासाहेब पाटोळे, मिलिंद भालसिंग, नितीन जोशी, किशोर कटोरे, लक्ष्मीकांत तिवारी, संदेश रपारिया, किसन भिंगारदिवे, शरद बारस्कर, आनंद मुथा, बहिरट मेजर, विठ्ठल दळवी, शशांक कुलकर्णी, विनायक बडे, सिद्धेश नाकाडे, शेषराव फुंदे, दत्ता जाधव, भुषण जारखंडे, पंकज जहागिरदार, आनंद मुथा, ऋग्वेद गंधे आदि उपस्थित होते.

    याप्रसंगी वसंत लोढा म्हणाले, भाजपाच्या सक्षम नेतृत्वामुळे देशात आज एक नंबरचा पक्ष म्हणून भाजपा आहे. पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी भाजपाच्या पक्षांची घोडदौड सुरु ठेवून आपल्या कार्याची प्रचिती आणून दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेले पक्षाचे काम कार्यकर्त्यांनी यापुढे असेच सुरु ठेवावे, असे आवाहन केले.

    यावेळी अ‍ॅड.विवेक नाईक, बाबासाहेब वाकळे, वसंत राठोड आदिंनी पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार पोटे यांनी केले तर आभार शिवाजी दहिंडे यांनी आभार मानले.



    

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post