नगर : पर्यटन स्थळांचा विकास आणि ऐतिहासिक वास्तूंची महती,जतन यासाठी लेखन करणारे राजेश सटाणकर यांना शरिफजीराजे भोसले पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. भातोडी ता. नगर येथील १६२४ मधील लढाईत शहाजीराजे व शरिफजीराजे भोसले बंधूनी मोजक्या सैनिकांना घेऊन गमिनी कावाने शत्रूच्या लाखो सैनिकांना नामोहरण केले.या लढाईत शरिफजीराजेंना वीरमरण आले.त्यांच्या स्मृतिप्रित्यार्थ सालाबादप्रमाणे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार सटाणकरसह ह भ प ॲड नाझिम शेख ( आळंदी ) , प्रा डॉ कामाजी ( औरंगाबाद ) ,संतोष जगताप ( पुणे) ,श्रीकांत म्हस्के (टा.काझी ) यांना स्मृतिदिन सोहळ्यात देण्यात आला.भातोडीच्या या सोहळ्यात यावेळी नगर पंचायत समिती सभापती संदीप गुंडसह सरपंच,उद्योजक,म न पा चे अधिकारी,राजकीय नेते,सामाजिक कार्यकर्ते,ग्रामस्थ उपस्थित होते.
सटाणकर हे गत ४१ वर्षापासून पत्रकारिता करीत आहेत.सरकारी नोकरी नाकारुन खडतर वाटचालीत त्पांनी अल्प मानधनावर पत्रकारितेच व्रत स्वीकारुन विविध वृत्तपत्रात काम केल.सिटी टाइम्स वृत्तपत्र चालवून त्यांनी सतिच वाण निभावल. बातमीशी प्रामाणिक राहून अन्यायाच्या विरोधात सटाणकरांची पत्रकारिता असून नागरी समस्यां,विकासाच्या प्रश्नाला महत्व त्यांनी दिले. पर्यटनाच्या माध्यमातून विकासाला चालना मिळावी यासाठी ते प्रयत्न करतात.देवीदासी- माळपरडी-आराधी आदि उपेक्षितांसाठी,नवोदितांना व्यासपीठ,गलिच्छ वस्तीतील प्रश्न यासाठी संघटनाद्वारे ते मांडतात. विशिष्ठ विचाराने भारावलेले सटाणकर निष्ठेने व सेवाभावीवृत्तीने कार्यरत आहेत.
अस्मिता वाङ् मय मंच,जि.पत्रकार संघासह इतर संस्था,संघटनामध्ये ते कार्यकारणीवर आहेत.त्यांना १९८९ मध्ये संपादकीय लिखानाबद्दल दा.प. आपटे पुरस्कार,२००५ व २०११ ला इंदिरा प्रतिष्ठानचा सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक,२०१२ म.शा.पर्यटन विभागाचा आदर्श पत्रकारिता व इतर ५ पुरस्कार त्यांना प्राप्त आहे.शरिफजीराजे पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
-
Post a Comment