शशिकांत नजान यांचा गौरव म्हणजे नाट्यवेड्या कलाकराचं कौतुकं :इतिहास संशोधक प्रा. नवनाथ वाव्हळ

शशिकांत नजान   नाट्यवेड्या कलाकराचं माठं कौतुकं  :       प्रा. नवनाथ काशिनाथ वाव्हळ, इतिहास संशोधक        अहमदनगर :  शशिकांत नजान ....नाट्य चळवळ आणि  अहमदनगर नगर पालिकेचे हरहुन्नरी कलाकार यांचा जुन्या काळापासून फार घनिष्ठ  संबंध इतिहासात आढळतो. अहमदनगर नगर पालिकेतील कार्यरत जुन्या पिढीतील    कलाकरांनी नाट्यवेडं मनापासून जपलं. नाट्यचळवळ जिवंत ठेवली.  नोकरी  संभाळून  नाट्यचळवळीला समृध्द केलेला इतिहास वाचला म्हणजे त्या नाट्यवेड्या कलाकराचं माठं कौतुकं  वाटतं, (ते कोण कलाकार? त्यांनी नोकरी संभाळून नाट्यचळवळ कशी  पुढं नेली हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल  )तसा सार्थ अभिमान वाटतो. तोच समृध्द वसा आणि वारसा आदरणीय शशिकांत नजान साहेब आपण तितक्याच ताकदीनं पुढं चालवत असलेला पाहुन तमाम अहमदनगरकरांना आपलं मोठं भूषण वाटतं. आपल्या कर्तबगारीचा सार्थ अभिमान वाटतो. ही आपली नाट्यचवळीतील अचाट व अफाट मुशाफिरी करतांना आपलं कर्तव्य ,जबाबदारी आणि समाजाप्रती असणारी सामाजिक जाण दिवसेदिवासं वाढतांनाच दिसते.  कारण आपण कोविड 19 च्या काळात अहमदनगरकरांच्या सेवेत महानगर     पालिकेच्या वतीने चालविवल्या जाणाऱ्या  उपाय योजना व इतर अनुषगीक कार्य करताना आपण    प्रयत्नांची पराकष्टा केली. कोरोनाग्रस्त पेशंटला थेट मिठी मारणारा अधिकारी आम्ही प्रथमच पाहिला..या संकट काळात शेकडो निराधार पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना दोस घास मिळावेत म्हणून डबे पुरवणा संवेदनाशील रंगकर्मी अफालातूनच होता.  आपल्या या अजब धाडसानं तो पेशंट अर्ध बरा झाला. हे जसं   माझ्या सारख्या संवेदनाशील प्राण्याला भावतं,तसं माझ्या सारख्या अनेकांना वाटत. म्हणूनच        आपला मोठा पुरस्कारानं गौरव सोहळा समाजानं या पुर्वी नुकताच केला आणि आपणांस विविधं नामंकित पुरस्कार देऊन आपल्या कर्तबगारीची कदर केली. त्याकामी आता सरकारही मागे नाही...आता त खुद्द मंञीमहोदयांच्या शुभ हस्ते आपला गौरव होतोय हे वाचून मोठा आनंद आमच्या मनी दाटून आलाय. आमच ऊरं भरुन आलय साहेब..आपल्या कार्यप्रती असणारी निष्ठा अवघ्या अहमदनगरकरांना एक दिवस वंदनीय वाटेल असा भविष्याचा वेध घेताना आम्हांला स्पष्ट दिसतय साहेब....असेच आनंददायी प्रसंग वारंवार आपल्या जीवनात येवो, ही सदिच्छा व्यक्त करुन थांबतो. पुन्हा  एकदा आपल्या आपल्या लोकोत्तर कार्याला आमचा सलाम साहेब!....सलाम..!!. सलाम!!!                      . प्रा. नवनाथ काशिनाथ वाव्हळ, इतिहास संशोधक

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post