नाकर्तेपणा झाकण्यासाठी टीव्हीवर रान उठवले जातयं, खासदार विखेंचा घणाघात

नाकर्तेपणा झाकण्यासाठी टीव्हीवर रान उठवले जातयं, खासदार विखेंचा घणाघात

अहमदनगर : स्वतःचा नाकर्तेपणा झाकला जावा यासाठीच राज्य सरकारमधील मंत्री टीव्हीवर रान उठवत आहेत.
नाकर्तेपणा झाकण्यासाठी राज्य सरकारही अशा लोकांना पुढे करीत आहे.
सध्या जे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री टीव्हीवर येत आहेत त्यांनी किती अल्पसंख्याकांना रोजगार दिला व अल्पसंख्याक बांधवासाठी कोणकोणती योजना राबवली यावर भाष्य करीत नाही अशी घणाघाती टीका भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा नामोल्लेख टाळत केली. फटाका बॉम्ब फोडण्याच्या घोषणा करण्याऐवजी शेतकऱ्यांसाठी अनुदानाचा बॉम्ब फोडा असेही ते म्हणाले.

पाथर्डी येथे मा. आ. स्व. माधवराव निऱ्हाळी नाट्यगृह व लोकनेते गोपनाथजी मुंडे जॉगिंग पार्क या कामाचे लोकार्पण भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना खासदार विखे यांनी राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर तोफ डागली.
विखे म्हणाले, ‘सकाळी टीव्ही चालू केला की एक मंत्री टीव्हीवर हजर दिसतो. तो झोपायला जातो की खुर्चीवरच झोपतो, हेच कळत नाही. कारण आपण रात्री टीव्ही पाहून झोपायला जाण्यापूर्वी तो खुर्चीवरच असतो, व सकाळी टीव्ही पाहताना त्याच खुर्चीवर दिसतो. या मंत्र्याला शेती उत्पन्नाबाबत काही माहिती नाही. पण गांजा किती रुपयांना मिळतो, हे माहिती आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरी छापा मारला तर कांदा, सोयाबिन, तूर सापडेल. मात्र यांच्या घरी छापा मारला तर गांजा सापडतो अशी घणाघाती टीका ही त्यांनी केली. महाराष्ट्रातील सात-आठ लोकांना टीव्हीवर येण्यासाठी बंदी केली पाहिजे. कारण या लोकांना पाहून घरामध्ये भांडणे होत आहेत अशी टीका करतानाच विखे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याएवढे आम्ही लाचार नाही
गेल्या काही दिवसात दर आठवड्याला नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा एक तरी मंत्री येतो. ज्यांच्यावर महाराष्ट्र व देशाची जबाबदारी आहे, ते देखील नगरला एका महिन्यात तिसऱ्यांदा आले. हे नेते नगर जिल्ह्यात आले पण ते त्या कामाची उद्घाटने करण्यासाठी आले ज्यामध्ये त्यांचे एक रुपयाचे सुद्धा योगदान नाही. महाविकास आघाडी सरकारने मागच्या वर्षात केलेले सर्व भूमीपूजन हे मागील भाजप सरकार काळात झालेले आहेत. पण जे स्वतः केले नाही, त्याचे श्रेय हे लोक घेत आहेत, असा टोला राज्य सरकारतील मंत्र्यांसह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे, दिवंगत डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या नेतृत्वात आपण सर्वजण वाढलो आहोत. त्यामुळे जे काम आपण केले नाही, त्याचे श्रेय आपण घेत नाही. आपण कधीही एवढी लाचारी पत्करली नाही,’ असेही ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post