पारनेर:(प्रतिनिधी) गोरेगाव ता पारनेर येथील आपुलकी मित्र मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच
गोरेश्वर मंदिर परिसर येथे सर्व सभासदाच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली.
या सभेत मंडळाचे नूतन अध्यक्ष म्हणून श्री बापू तांबे (मेजर), उपाध्यक्ष म्हणून श्री रावसाहेब तांबे तर सचिव म्हणून श्री श्रीकांत नरसाळे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
मंडळाची स्थापना मागील तीन वर्षांपूर्वी झाली असून सतत सामाजिक उपक्रम राबविण्याचा मंडळाचा प्रयत्न असतो .
याचाच एक भाग म्हणून कोरोना महामारीच्या काळात मंडळाने गोरेगाव येथील कोविड सेंटरसाठी मंडळाच्या वतीने मदत केली.सर्व सभासदाच्या अनमोल योगदानामुळे मंडळाकडे आवश्यक निधी जमा होतो व यानिधीतुनच सामाजिक कामे करण्याचा मंडळाचा प्रयत्न असतो.
आज मंडळामध्ये एकूण 14 विश्वासु सदस्य असून त्यामध्ये सर्वश्री रामदास नरसाळे, साहेबराव नरसाळे, जयराम तांबे, त्रिभुवन लष्करे, संतोष नरसाळे, भाऊसाहेब तांबे, गणेश नरसाळे, भरत तांबे, रघुनाथ चौरे, दशरथ थोरात, संपत नरसाळे कार्यरत आहेत.
नुकतेच दिपावलीच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने सभासदांना रशियन ब्लँकेट, मिठाई पुडा देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन श्री भाऊसाहेब तांबे यांनी तर आभार रघुनाथ चौरे यांनी केले.
...................................
Post a Comment