लोक भावनेशी खेळण्याचा खोटेपणाचा नवं पर्व विचार शून्यतेच्या राजकारणाचा नवा अध्याय. - पिसाळ

लोक भावनेशी खेळण्याचा खोटेपणाचा नवं पर्वाचा
विचार शून्यतेच्या राजकारणाचा नवा अध्याय. - पिसाळ
       कर्जत (विशेष प्रतिनिधी)      तालुक्याचा पाण्याबाबतचा इतिहास थोरामोठ्या सहित लहान मुलांनाही तोंडपाठ आहे . पाण्यासाठी वणवण करणारे प्राणी आणि डोक्यावर हंडा ही तशी जुनी ओळख, त्यानंतर पाण्याचे टॅकर आणि सायकलला अडकवलेले प्लॅस्टिकचे ड्रम ....
     साधारणतः फेब्रुवारी पासून ही वणवण सुरु व्हायची याला पर्याय नव्हता अशातच युती शासनाच्या काळात कुकडी कॅनॉलचे काम झाले तालुक्यात विविध ठिकाणी पाटपाण्यामुळे सुबत्ता यायला लागली निर्विवादपणे इथला समाज पक्षीय राजकारणात भाजपा बरोबर राहिला परंतु भाजपा, युती शासनाच्या काळा नंतर प्रदीर्घ काळ सत्तेत नव्हता परंतु येथील लोकप्रतिनिधी मात्र भाजपचेच होते व येथील लोक त्या विचारा बरोबरच होते ..... अशातच२०१४ ला भाजप सरकार महाराष्ट्रात देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वा खाली स्थापन झाले त्यामध्ये कर्जत जामखेड चे लोक प्रतिनिधी म्हणून प्रा श्री राम शिंदे साहेब यांची मंत्रिपदी वर्णी लागली साहजिकच लोकांच्या आशा, अकांक्षा, अपेक्षा उचावल्या कारण मध्यंतरीच्या आघाडीच्या सत्तेच्या काळात पाण्यासाठी वेठीस धरण्याचे काम सत्तेतील पक्ष करत होते . पाण्याच्या आवर्तनासाठी संघर्ष करावा लागायचा. येथील लोकप्रतिनिधी आघाडीचा देण्याच्या बदल्यात भरपूर पाणी देऊ? असे दमबाजी पुणेकर मंत्री इथे येऊन करायचे हा ताजा इतिहास आहे.......
              आता वेळ बदलली होती श्री. राम शिंदे साहेबाच्या रुपाने आता खमक्या माणूस मंत्रिमंडळात होता आणि हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत नव्हता ........
                त्याचवेळी तालुक्यातील काही गावे अवर्षण प्रवण क्षेत्रात येत होती आणि भौगोलिक संरचनेमुळे पाटपाणी जाणे शक्य नव्हते म्हणून त्या भागासाठी " तुकाई चारीचे " काम प्रस्तावित करणेत आले हि उपसा जलसिचन योजना होती आणि त्यामध्ये प्रत्यक्ष सिंचन न होता अवर्षण प्रवण भागातील लघुपाटबंधारे तलाव त्याद्वारे भरायचे कारण या भागात पर्जन्यमान अतिशय कमी असते त्यामुळे या योजने ने त्या भागाला दिलासा मिळणार होता. आणि हे घडवून आणले होते चाणाक्ष लोकप्रतिनिधी श्री राम शिंदे साहेब यांनी ..........
याचे कारण ही तसेच होते पाणी शिल्लकच नाही त्याचे वाटप झाले आहे असे पुणेकर लोकप्रतिनिधी म्हणायचे पाणीच नाही तर द्यायचे काय?? हा त्यांचा हमखास ठरलेला डायलॉग होता परंतु इच्छा असेल, तळमळ असेल तर भगीरथाने ही गंगा जमिनीवर आणलीच होती त्याचप्रमाणे शिंदे साहेबांनी पुणेकरांच्या डोळ्यादेखत कागदोपत्री प्रयत्न करून योजनेसाठी पाणी उपलब्ध केले ..... आणि त्या अवर्षण प्रवण गावांचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले,,हा संघर्ष ही सोप्पा नव्हता ... धरणा वाल्यांच्या घरातून पाणी आणणे .
                 तर अशी हि योजना निवडणूक काळात(२०१४) विद्यमान लोकप्रतिनिधीनी तिची खिल्ली उडवत यापेक्षा आपण आणखी शाश्वत योजना आणणार म्हणत मताच्या राजकारणात अश्वासनाचे भरघोस पिक पेरले आणि मताचे पिक ही काढले त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सत्तापरिर्वन झाले, २वर्षे झाले सत्ता बदल होऊन अश्वासन पूर्ती झाली नाही पण उलटअश्वासन हवेत विरलं योजना गुंडाळण्यात आली?.....
अधिकृत स्तरावर माहिती घेता त्याबाबत प्रशासन कानावर हात ठेवते 
लोक प्रतिनिधीना प्रश्न विचारला असता त्यासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या नाहीत म्हणून योजनेला विलंब होत आहे असे ते जाहीर सभेत सांगत आहेत ...
लोकभावना योजना कार्यरत होण्याची आहे आणि लोकप्रतिनिधी तांत्रिकतेचा खेळ खेळत आहेत ..... बरं तो खेळ तरी खरा असावा खोटं बोलण्यात काय हाशिल????
तुकाई उपसा जलसिंचन योजनेला तांत्रिक निकषात अडकवून लोकप्रतिनिधी त्यांच्या विचार शून्यतेच्या राजकारणाचा परिचय देत आहे ........
उलट आपण शासनात आहात सरकार आपले आहे .... तुम्ही या योजनेत आणखीही वंचित गावांचा समावेश करून दिलासा दिला पाहिजे या सकारात्मक दृष्टिकोना साठी आमचा पाठिंबाच राहिल ......
आपण या गावांसाठी पाणी उपलब्ध केले तर या चांगल्या कामाचे कौतुक करू आणि पाठिंबाही देऊ ......
पण काहीच न करता फक्त आणि फक्त लोकभावनेचा अनादर जर असेल तर मग काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील ....
जर हे तांत्रिक कारण तुकाई चारीसाठी असेल तर मग ढेरेमळा ते म्हस्के मळा टाकोबा ओढा या लोकहिताच्या चारी बाबत काय?? 
लोकांनी त्यांची गरज तुम्हाला सांगितली आणि लोकांची मागणी रास्त होती शेतकऱ्याला पाणी मिळणे गरजेचे होते . तुम्हीही ही मागणी मान्य करत चारीच्या कामाला सुरवात केली आणि मताच्या राजकारणात तुम्ही फक्त आणि फक्त लोकभावनेशी खेळळात, मते ओरबाडची किंवा लुटायची म्हणून खोटं खोटं बोलत राहिलात? एक समाजसेवी संघटना, त्यातील काही मंडळी हाताशी धरून मशिनने चारी खोदण्याचे नाटकं केलेत कोणतेही तांत्रिक मंजुरी न घेता, त्यासाठी कोणत्या आवश्यक परवानग्या, टोपोग्राफिक सर्व्हे, अंदाजपत्रक केले का?? फक्त सीएसआर फंडाच्या माध्यमातून चारी खोदली?? त्या संस्थेला काम केल्याचे पुण्य लाभले?? तुम्हीही खोट्या कर्तव्य पूर्ती भावनेचा खोटा आनंद घेतला?? पण हे लोक हिताचे काम होणे गरजेचे आहे निवडणुकी नंतर तुम्ही विसरून गेलात .. ते काम तुम्ही प्राधान्याने करणे गरजेचे आहे ... त्याच्या परवानग्या, तोत्रिकतेविषयी कोणीही प्रश्न उपस्थित करत नाही आणि तुम्हाला तांत्रिकतेतच रस असेल तर तुकाई चारीच्या मान्यतेच्या, तांत्रिकतेच्या बाबतीत आणि ढेरेमळा ते भैरोबावाडी चारीच्या बाबतीत समोरासमोर एका व्यासपीठावर दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या .......
असाच काहीसा प्रकार पाटेवाडी भागात हि केला आहे निवडणूक काळात खोदाखोदी केली ती पण अपूर्ण ......
एवढाच तुम्हाला तांत्रिकतेचा मान्यतेचा सोस असेल तर तुम्ही खोदलेल्या चारीचे तांत्रिक निकष पूर्ण करणाऱ्या परवानग्या आणि तुकाई चारीच्या तांत्रिकतेच्या परवानग्या यासाठी एका व्यासपीठा समोरासमोर येण्याची आमची तयारी आहे आपण त्या अर्धवट खोदलेल्या चारीचे कागदपत्र घेऊन यावे ...
खोटं बोल पण रेटून बोल हा प्रकार जनतेच्या भावनेशी खेळण्याचा आहे .
    तुकाईचारी उपसा जलसिंचन योजना अवर्षण प्रवण भागाच्या अस्मितेचा प्रश्न तर आहेच पण जीवन मरणाचा सुद्धा प्रश्न आहे यावर आपण एक पुणेकर म्हणून भूमिका मांडत आहात कर्जत जामखेडचे लोकप्रतिनिधी म्हणून नाही. लोकभावनेच्या प्रश्नावर तांत्रिक मुद्दे जे खोटे आहेत ते उपस्थित करून त्यांच्या दुःखावर मीठ चोळण्याचे काम करत आहात .........
हेच विचार शून्यतेचे नवं पर्व असेल तर पुन्हा तालुक्याच्या नशिबी जुन्या ओळखीचा शिक्का ठरलेला असेल ..

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post