कजबेवस्ती येथील यमाई माता मंदिरात नवरात्रौत्सवाची सांगता


     नगर - भिस्तबाग येथील कजबे वस्ती येथे भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यमाई मातेच्या मंदिरात शारदिय नवरात्रौत्सव उत्साहात संपन्न झाला. शासकीय नियमांचे पालन करत परिसरातील भाविकांनी गेल्या 9 दिवसांपासून दर्शनाचा लाभ घेतला. मंदिराचे पुजारी सिताराम कजबे व सौ.कलाबाई कजबे यांनी या काळात मातेची परंपरेनुसार नित्य पुजा केली. अष्टमीला होम-हवन करण्यात आले.  यावेळी दिपक कजबे, सौ.सुजाता कजबे, महेश काजंळकर, गुलाब कजबे, नारायण मंडलिक आदि उपस्थित होते. यंदाच्या वर्षी शासकीय आदेशानुसार कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम घेण्यात आला नाही.

     गेल्या काही वर्षांपासून सभा मंडळाचे काम अपुर्ण राहिले होते. सिताराम सोनाजी कजबे यांनी ते काम स्वखर्चाने पूर्ण केले. यासाठी भाविकांनीही सहकार्य केले.  यंदाच्या वर्षी मर्यादित स्वरुपात हा नवरात्रौत्सव साजरा झाला असला तरी पुढीलवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येईल, असे सांगितले.

--------

   

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post