वाढदिवसानिमित्त सर्व पक्षीय नेत्यांच्या शुभेच्छा : कॅल्शियम तपासणी व रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद
बाळासाहेबांनी दिलेले शिवसैनिकाचे पद सर्वांत मोठे!
- भगवान फुलसौंदर
नगर- शहराचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. नगरकरांच्या चांगल्या भवितव्यासाठी आगामी काळात त्यांना मोठे पद मिळो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. ’शिवसैनिक हे मिळालेले सर्वांत मोठे पद आहे,’ अशी भावना श्री. फुलसौंदर यांनी व्यक्त केली. यानिमित्त आयोजित रक्तदान व कॅल्शियम तपासणी शिबिरास अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.
वाढदिवसानिमित्त फुलसौंदर कुटुंबीय व त्यांची मित्रमंडळी यांनी नेहमीप्रमाणेच समाजोपयोगी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले होते. शहराच्या प्रथम महापौरांना वेगवेगळ्या पक्षांच्या व संघटनांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.
अभिष्टचिंतन करण्यासाठी ’नक्षत्र लॉन’ येथे आलेल्या सर्व पक्षीय नेत्या-कार्यकर्त्यांचे मग जणू स्नेहसंमेलनच झाले. या अनौपचारिक संमेलनात विविध पक्षांच्या नेत्यांनी-पदाधिकार्यांनी श्री. फुलसौंदर यांना शुभेच्छा देताना त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीचे कौतुक केले. त्यांना भविष्यात याहून मोठी संधी मिळेल. त्यामुळे नगरकरांचा फायदाच होईल, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी श्री. फुलसौंदर यांचा सत्कार केला. शुभेच्छापर भाषणात त्यांनी श्री. फुलसौंदर यांच्या कामाचे कौतुक केले. आमदार नीलेश लंके यांनीही सर्वसामान्य नागरिकांशी असलेल्या त्यांच्या बांधिलकीबद्दल गौरवोद्गार काढले.
सत्काराला उत्तर देताना श्री. फुलसौंदर म्हणाले, ’’तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांमुळे मी भारावून गेलो आहे. दिवंगत हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत माजी आमदार अनिलभैया राठोड यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शक्य तेवढे चांगले काम केले. मला अधिक मोठे पद मिळो, अशा सदिच्छा सर्वांनीच व्यक्त केल्या. बाळासाहेब आणि अनिलभैया यांनी मला ’शिवसैनिक’ हे सर्वांत मोठे पद दिले आहे! त्याचा मला मनस्वी अभिमान आहे.’’
ज्येष्ठ नेते वसंत लोढा म्हणाले की, शहराची सद्यःस्थिती पाहता अनिलभैय्या यांचा वारसा सांगणार्या भगवानराव यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. महापौर सौ. रोहिणीताई शेंडगे, शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, ज्येष्ठ नेते अनिल शिंदे, संभाजी कदम, गणेश कवडे, संदेश कार्ले, युवा सेनेचे विक्रमभय्या राठोड, बाळासाहेब बोराटे, माजी महापौर अभिषेक कळमकर, अशोकराव बडे, सुरेश तिवारी, भारतीय जनता पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष महेंद्र ऊर्फ भय्या गंधे, काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष किरण काळे, सचिन जाधव, अंबादास गारुडकर यांनीही श्री. फुलसौंदर यांना शुभेच्छा दिल्या. त्यांना भविष्यात मोठे पद मिळेल, अशी अपेक्षा सर्वच वक्त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास सर्वश्री. भिंगार बँकेचे चेअरमन अनिलराव झाडगे, व्हा.चेअरमन किसनराव चौधरी, संजय शेंडगे, अशोक दहिफळे, परेश लोखंडे, अमोल येवले, महिला सेनेच्या आशाताई निंबाळकर, अरुणाताई गोयल, अनुरिता झगडे, अविनाश कोतकर, सुरेश क्षीरसागर, दत्ता जाधव, संग्राम शेळके, रवी लातबांद्रे, सुवेंद्र गांधी, संजय आव्हाड, मोहनशेट लुल्ला, जालिंदर कोतकर, दत्ताशेट सप्रे, सुनील राऊत आदी उपस्थित होते.
श्री. भगवान फुलसौंदर यांच्या वाढदिवसानिमित्त नक्षत्र प्राणायम ग्रूप, साई सिंडिकेट, संकल्प ग्रूप, शिवसेना नगर शहर, विनायकनगर परिसरातील नागरिक व मित्रमंडळी यांनी दोन आरोग्यविषयक उपक्रम आयोजित केले होते. अष्टविनायक रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित शिबिरात 108 नागरिकांनी रक्तदान केले. त्यासाठी जितेंद्र पलिकुंडवार व त्यांच्या सहकार्यांची मोलाची मदत झाली. प्रसिद्ध डॉक्टर संदीप सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली हाडांतील कॅल्शियमची आधुनिक यंत्राच्या साहाय्याने तपासणी करण्यात आली. त्याचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन विष्णू फुलसौंदर, अवधूत फुलसौंदर यांनी केले.
----
Post a Comment