अहमदनगर (प्रतिनिधी) राष्ट्रीय समाज पक्षाच्या अहमदनगर येथील कार्यालयाचे उदघाट्न व पदाधिकारी आढावा बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव यांच्या उपस्थितीत संस्कृती मंगलकार्यालय अहमदनगर येथे घेण्यात आली या बैठकीचे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र प्रभारी माऊली सलगर होते.पक्षाचे जनसंपर्क कार्यालय उदघाटन महादेव जानकर यांच्या हस्ते झाल्यानंतर आढावा बैठक घेताना पदाधिकारी यांची चांगलीच कानउघाडणी करून जोमाने नगर पालिका पंचायत समिती जिल्हापरिषदा साठी सज्ज व्हावे तसेच राज्यातील जिल्हा व तालुका पदाधिकारी यांचे दोन दिवसाचे ट्रेनिंग घेणार असल्याचे सांगितले,पश्चिम महाराष्ट्र प्रभारी माऊली सलगर यांनी कार्यकर्ते पक्षाचे सक्रिय सभासद झाल्याशिवाय कोणालाही पदावर घेऊ नये तर पश्चिम महाराष्ट्र युवक प्रभारी अजित पाटील यांनी प्रत्येक तालुका मध्ये पक्षाचे फुलटाइम काम करणारे शंभर युवक तयार करा तसेच पश्चिम महाराष्ट्र अल्पसख्याक प्रमुख शाहिद मुलाणी यांनी मुस्लिम समाजाच खरहित राष्ट्रीय समाज पक्षातच असुन त्या पद्धतीने कामाला लागावे.त्याचप्रमाणे पश्चिम महिला अध्यक्षा सविता जोशी यांनी महिला पुरुषांच्या खांद्याला खांद्या देऊन पक्षाची जबाबदारी पार पडण्याचे महिला पदाधिकाऱ्याना आव्हान केले .याप्रसंगी उत्तर जिल्हाप्रभारी नानासाहेब जुंधारे यांनी पक्षाचे कार्यालयासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांना धन्यवाद दिले तर सर्व पदाधिकारी तन मन धनाने पक्षाचे काम वाढवतील यांची गव्हाही दिली दक्षिण प्रभारी गंगाधर कोळेकर यांनी पक्षाच्या लवकरच गाव तिथे शाखा काढणार असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रस्ताविक युवक आघाडी जिल्हा प्रभारी माऊली जायभाये यांनी केले व युवकांसाठी जिल्हात पक्षकामाचे ट्रेनिंग सेंटर लवकरच सुरु करणार असल्याचे सांगितले याप्रसंगी रासपचे नेते संतोष काळे,डॉ प्रल्हाद पाटील रासप, जिल्हा सरचिटणीस रमेश व्हरकटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तर सर्वाचे आभार शेतकरी आघाडी चे जिल्हा प्रभारी गोरख वडीतके यांनी मानले
या कार्यक्रमसाठी रासप उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविंद्र कोठारी, जेष्ठ नेते मेजर हाके, शहाजी कोरडकर, रभाजी खेमनर,महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णा जऱ्हाड,मंदाकिनी बडेकर, सखाराम सरक प्रा संभाजी लोंढे, नानासाहेब जगताप, सीताराम वनवे, बाजीराव लेंडाळ,डॉ सुनील चिंधे,चिमाजी खामकर,,पोपट गुलदगड, अमोल जाधव,लक्ष्मण कोकरे, आप्पासाहेब ढोकणे,पोपट महानोर, नामदेव काशीद,अंकुश बोके,नंदकुमार खेमनर,आत्माराम कुंडकर,दत्तात्रय शिंदे,गोरख येळे,भगवान करवर,मीनाताई राहिंज, रेखा नरवडे,सुशीला शेवाळे, सविता दिघे बिलाल शेख अमोल मदने आदी पदाधिकारी उपस्थित होते
Post a Comment