ओबीसीआरक्षणात सरकार आणणारेच झारीतील शुक्राचार्य :-माजीमंत्री बावनकुळे यांची शरद पवारांचे नाव न घेता टीका

        


अहमदनगर-आमचे(भाजप) सरकार असताना ओबीसी आरक्षण कायम ठेवण्याचा अध्यादेश आम्ही काढलाहोता. त्याची सहा महिने मुदत होती. ती संपत येण्याआधीच आम्ही वडेट्टीवार,भुजबळ व पटोले यांना भेटून मुदतवाढ करण्याचे सुचवले. पण महाविकासआघाडी सरकार आणणार्‍या झारीतील शुक्राचार्यांना ओबीसी आरक्षण होऊ द्यायचेनाही, असा घणाघाती आरोप माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी राष्ट्रवादीचेअध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता येथे केला. दरम्यान, 2024च्या निवडणुकीचीतयारी आम्ही सुरू केली आहे. पण उद्या जरी निवडणुका झाल्या तरी पंढरपूरपॅटर्नप्रमाणे आम्हीच बाजी मारू व या तीन पक्षीय ऑटो रिक्षाला पंक्चर करू, असादावाही बावनकुळे यांनी केला.

भारतीयजनता युवा मोर्चाद्वारे युवा वॉरियर्स संघटनात्मक बांधणी अभियानाच्यानिमित्तानेबावनकुळे नगरला आले होते. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदारटीका केली. ओबीसींचे राजकीय आरक्षण 1994पासून आहे. एकूण आरक्षण 50टक्क्यावर जाऊ नये व त्याबाबत निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाचेसांगणे होते. त्यानुसार 31जुलै 2019ला फडणवीस सरकारने वटहुकूमकाढून 27 टक्के आरक्षण लागू केले. त्यानंतर 5 जिल्हा परिषदांच्यानिवडणुका नियोजन झाले.पण विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेने यानिवडणुका झाल्या नाहीत. राज्यात नवीन सरकार आल्यावर आम्ही काढलेल्याअध्यादेशाची सहा महिन्यांची मुदत संपत असल्याने तीन मंत्र्यांना भेटलो व जानेवारी2020मध्ये मुदतवाढीची मागणी केली. पण सरकार आणणार्‍यांनाच हे आरक्षण नकोहोते. त्यामुळे ही मुदतवाढ दिली गेली नाही. परिणामी, न्यायालयाने हे आरक्षणरद्दबातल ठरवले व या विषयाबाबत आपण कोणाशीही व कोणत्याही चौकात जाहीर चर्चाकरण्यास तयार आहोत, असे आव्हानही बावनकुळे यांनी दिले.

जानेवारी2022नंतर राज्यात 85 टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत व त्यातओबीसींना संधी द्यायची नाही, असे राज्य सरकारने ठरवले आहे, असा आरोप करूनबावनकुळे म्हणाले, त्यामुळे येत्या डिसेंबर 2021पर्यंत ओबीसी ड़ेटा गोळाकरून राज्य सरकारने न्यायालयाला दिला नाही तर भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. मंत्र्यांनागावा-गावांतून येऊ दिले जाणार नाही. राज्य सरकारला जनगणना करायची नाही तर फक्त ड़ेटाद्यायचा आहे. गावा-गावांच्या रजिस्टरमधून एससी, एसटी, ओबीसी व खुले अशी नावेस्वतंत्र करून त्याचा डेटा न्यायालयाला द्यायचा आहे. यासाठी पाहिजे ती मदतभाजप द्यायला तयार आहे. एका गावातील अशी माहिती आम्ही दोन दिवसात तयार केलीआहे. त्यामुळे पाच महिन्यात सरकारला राज्याची अशी माहिती जमवणे सहजशक्य आहे, असादावाही त्यांनी केला.

--चौकट

आमचाही...लावरे तो व्हीडीओ

विधानसभेच्यानिवडणुकांच्या काळात 22 सभांतून उद्धव ठाकरे यांनीच फडणवीसचपुढचे मुख्यमंत्री असतील, असे जाहीर केले होते. त्यांच्या त्या सभांचेव्हीडीओ आमच्याकडे आहेत. नंतर त्यांनी स्वतः मुख्यमंत्रीपद घेतले. शिवसेनेनेएकप्रकारे भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे एकदा निवडणुका लागूद्या. मग आम्हीही लाव रे तो व्हिडीओ..सुरू करणार आहोत. पंढरपूरपोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री महिनाभर तळ ठोकून होते. तिन्ही पक्ष एकत्रअसताना त्यात आम्ही बाजी मारली. त्यामुळे उद्या निवडणूक लागली तरी आमचापंढरपूर पॅटर्न ठरलेला आहे, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

--

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post