5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत
नगर,ता.22- स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात अवैध धंद्याविरूध्द धाडसत्र राबवित मोठी कारवाई केली. जिल्ह्यात 36 ठिकाणी छापे टाकून सुमारे 5 लाख 6 हजार 880 रूपयांचा मुद्देमाल हस्तग केला आहे. या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
दि. 11 ते 21 जुलै दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. गावठी हातभट्टीची तयार दारू, कच्चे रसायन, भट्टीची साधने जप्त करून 38 जणांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जामखेड, सोनई, नगर तालुका, श्रीरामपूर शहर, राहुरी, कोतवाली, श्रीरामपूर तालुका, शिर्डी, भिंगार कॅम्प, कर्जत, तोफखाना, एमआयडीसी, संगमनेर, पाथर्डी या पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे.
Post a Comment