अहमदनगर(प्रतिनिधी) जिल्ह्यातील सर्व आमदार व मंत्री यांना धनगर समाज अनुसूचित जमातीचे आरक्षणासाठी व मेंढपाळ बांधवांच्या समस्या दुर करण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनात मुद्दा उपस्थित करावा यासाठी धनगर समाज संघर्ष समिती अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने जिल्हा अध्यक्ष इंजिनिअर डी आर शेंडगे व समिती हे निवेदन पाठवत असुन सरकारने गांभीर्याने विचार करावा अशी मागणी केली आहे
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणी चा प्रश्न 70 वर्षांपासून प्रलंबित आहे सरकारने केंद्र सरकारकडे आरक्षण नियोजनात अंमलबजावणी साठी शिफारस पाठवावी तसेच मेंढपाळांचे चारा,विमा व सुरक्षेचे प्रश्न आहेत ते सरकारने अधिवेशनात निकाली काढावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे
Post a Comment