नॅशनल पोस्टल सोसायटीची अल्पावधीत स्वभाडवलाकडे वाटचाल: संतोष यादव कर्जावरील व्याजदरात 1 जुलै 21 पासून 1% कपात

नॅशनल पोस्टल सोसायटीची अल्पावधीत स्वभाडवलाकडे वाटचाल:   संतोष यादव
कर्जावरील व्याजदरात 1 जुलै 21 पासून 1% कपात

अहमदनगर: अहमदनगर डिस्ट्रिक्ट नॅशनल पोस्टल को ऑ क्रेडिट सोसायटीची स्थापना  5 एप्रिल 2016  मध्ये झाली असून,संस्था आपल्या सभासदास कमीतकमी दराने कर्ज उपलब्ध करून देते,संस्थेची कर्जवसुली ही सभासदांचा पगारातून होत असल्यामुळेच संस्था वेगाने प्रगती करत आहे.संचालक मंडळ सभासदाच्या हितास अधिकाधिक प्राधान्य देत आहे.त्यामुळे ही संस्था अल्पावधीतच स्वभांडवलाकडे वाटचाल करत आहे.त्याबदल संस्थेचे जेष्ठ सभासद श्री संतोष यादव यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
     संस्थेची 6 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि 3 जुलै 21  रोजी ऑनलाइन पध्दतीने संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षपदी संस्थेचे चेअरमन मा श्री शिवाजी जावळे हे होते.
संस्थेचे कार्यकारी संचालक श्री सचिन गायकवाड यांनी सभेच्या नोटीसचे वाचन करून ,संस्थेचे आर्थिक पत्रके हे सभेपुढे  सादर केले. सभासदाने ते टाळ्यांचा गजरात मंजूर केले.
   संस्थेचे जेष्ठ सभासद  श्री संतोष यादव यांनी  सभेस मार्गदर्शन करताना, संस्थेचे आर्थिक पत्रके  सभासदासमोर मांडून त्या विषयी सविस्तरपणे मार्गदर्शन केले.  संस्था नवीन असूनही अल्पावधीच स्वभाडवलाकडे वाटचाल करत असून, सद्यस्थितीत उपलब्ध निधी मधून  संस्था ही  सभासदास कमीत कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देत असून,सदैव सभासद हितास प्राधान्य देत आहे. विदमान संचालक मंडळ अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज करून असून ,आपण आजवर जे सहकार्य केले तसेच सहकार्य या पुढेही करा असे आवाहन केले.
      संस्थेचे चेअरमन श्री शिवाजी जावळे यांनी संस्थेच्या कर्जावरील  व्याजदरामध्ये दि 1 जुलै 21 पासून 1%कपात,संस्थेची मासिक वर्गणी एक हजार वरून एक हजार पाचशे करण्याची विनंती करत ,मा सहकार आयुक्त पुणे यांचे दि  31/12/2020 परिपत्रकानुसार पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थाना द्यावयाच्या कर्जमर्यादा वाढीबाबत निर्णय घेण्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे सभेस ऑनलाइन उपस्थित सभासदास उपस्थिती भत्ता देण्याचे जाहीर केले.
   सभेस व्हा चेअरमन श्री नामदेव डेंगळे, संचालक श्री प्रकाश कदम,  श्री राधाकिसन मोटे श्री प्रदिप सूर्यवंशी श्री संजय बोदरडे, श्री रावसाहेब चौधरी,श्रीमती जे पी गटणे,श्रीमती एच आर मगर, यांचेसह  संस्थेचे व्यवस्थापक  श्री दंडवते , मा श्री चौधरी उपस्थित होते. सभासद  मोठया संख्येनेऑनलाइन जॉईन झाले होते. 
सभेस श्री अमित देशमुख,श्रीमती शहाणे मॅडम,श्री चाफे हे उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन श्री बापू तांबे तर आभार श्री नामदेव डेंगळे यांनी केले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post