अण्णासाहेब डांगे यांच्या ८५ व्या वाढदिवसा निमित्त दीनदयाळ व संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या कार्यस्थळांवर वृक्षारोपण व ऑनलाईन पध्दतीच्या विविध स्पर्धा संपन्न
अहमदनगर(प्रतिनिधी)
महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री मा . श्री . अण्णासाहेब डांगे ( आप्पा ) यांच्या ८५ व्या वाढ दिवसा निमित्त येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळांवर व संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा , कॉलेज परिसरात कोरोणा साथीच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून सामाजीक उपक्रमाच्या माध्यमातुन वृक्षारोपण करण्यात आले . दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळांवर सूतगिरणीचे माजी व्हा . चेअरमन व विद्यमान संचालक मा . श्री . सुमंत महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . यावेळी सूतगिरणीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर , इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष मा . अँड . राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे , इस्लामपूर नगर परिषदेचे सभापती , सिध्दीविनायक नागरी सहकारी पतसंस्थे चेअरमन मा . श्री . विश्वनाथ डांगे ( बापू ) , संचालक रमेश बडे , अमोल चौधरी , दयानंद चव्हाण , डॉ . शिवाजी जाधव , राजेंद्र लोंडे , मंगेश लवटे यांच्या सह सूतगिरणीचे जनरल मॅनेजर विनोद देशमुख , फायनान्स मॅनेजर राजेंद्र मिरजे , प्रोडक्षण मेनेजर सुर्यकांत देसाई , डी . एस . पाटील , लेबर ऑफीसर अदित्य यादव , इंजिनिअरिंग मॅनेजर सातलिंग मेत्री , वसीम पठाण , मेंन्टनस मॅनेजर श्रीहरी कुंभार , उमेश गावडे , अशोकराव बडदे , विजय कवठेकर , आदी अधिकारी उपस्थित होते . तसेच संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या आष्टा , कार्वे , कारंदवाडी , पलूस , तासगांव , रेठरेधरण , भडकंबे , बावची , चौंडी , या शाखांच्या वतीने ही निबंध , वक्तृत्व , चित्रकला स्पर्धा व वृक्षारोपण करण्यात आले . सर्व स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाल्या . शिक्षण संस्थेमध्ये कार्यकारी संचालक प्रा. आर . ए . कनाई , प्राचार्य सुभाष पाटील , महेश सरनया , डॉ . विक्रमसिंह पाटील , ए.के. साजने , डॉ . अशोक वाली , डॉ . योजना जुगळे , डॉ . अमर कांबळे , रघुनाथ बोते , यांच्या शुभहस्ते सर्व शाळा कॉलेजमध्ये वृक्षारोपण करण्यात आले .
दीनदयाळच्या कार्यस्थळांवरील कार्यक्रमाचे संयोजन बजरंग कदम यांनी केले , व संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या विविध शाखांतील कार्यक्रमांचे संयोजन दिपक आडसुळ , सुनिल शिनगारे , अजित पाटील , विजय पाटील यांनी केले. ८५ व्या वाढदिवसा निमित्ताने नारळ , चिक्कु , आंबा , साग , वड , पिंपळ व आयुर्वेदीक वनस्पतींचे वृक्षारोपण सर्व ठिकाणी करण्यात आले.
मा . श्री . आण्णासाहेब डांगे ( आप्पा ) यांना ८५ व्या वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे खासदार , आमदार , विविध राजकीय पक्षांचे प्रदेश अध्यक्ष , राज्य पदाधिकारी , विविध संघटनांचे प्रमुख , विविध सहकारी संस्था चे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, जिल्हा परिषद सदस्य , अध्यक्ष , आजी व माजी नगरसेवक , सामाजीक , शैक्षणीक , आर्थिक व औद्योगीक तसेच सहकार , व्यापारी, शेतकरी , नागरीक व विविध क्षेत्रात कार्यरत असणारे पदाधिकारी , कार्यकर्ते , अशा राज्यभरातुन हजारो मान्यवरांनी दूरध्वनीवरून तसेच अनेक मान्यवरांनी इस्लामपूर येथील निवासस्थानी तसेच आष्टा येथील शैक्षणीक संकुलामध्ये प्रत्यक्ष भेटून वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या .
Post a Comment