मांडवे येथील काकासाहेब म्हस्के विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
नगर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मांडवे येथील काकासाहेब म्हस्के माध्यमिक विद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२१ च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे, व विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे, अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय गुंड यांनी दिली.
विद्यालयातून एकूण 34 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी विशेष प्राविण्यमध्ये १३, प्रथम श्रेणीमध्ये १५ व द्वितीय श्रेणीमध्ये ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विदयालयामध्ये प्रथम क्रमांक कु.निमसे वेदांती अशोक 92 टक्के, द्वितीय क्रमांक कु.निमसे आदिती पोपटराव 88.80 टक्के,
तृतीय क्रमांक निमसे साक्षी संजय 87.60 टक्के यांनी मिळवला.
यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक दत्तात्रय गुंड , शिक्षक कल्याण ठोंबरे, बबन खांदवे, पंढरीनाथ निमसे, धनराज शेवाळे व प्राजक्ता खांदवे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.दत्तात्रय निक्रड, संस्थेचे सचिव व गावचे सरपंच सुभाष निमसे,उपसरपंच संजय निमसे, डॉ.प्रशांत निक्रड, ग्रा.पं.सदस्य शामराव निमसे, माजी सरपंच संजय निमसे,कृषी उत्पन बाजार समितीचे संचालक बाळासाहेब निमसे, सेवा संस्थेचे चेअरमन पांडुरंग निमसे, उद्योजक बबन निमसे,पत्रकार ज्ञानेश्वर निमसे,चंद्रकांत शेळके, भाऊसाहेब होळकर,माजी पंचायत समिती सदस्य पोपटराव निमसे,रमेश पिंपळे, सरपंच अजय बोरूडे,उक्कडगावचे सरपंच नवनाथ म्हस्के,पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष केशव निमसे, संतोष निमसे, महेंद्र निक्रड, सदाशिव भालेकर, तुकाराम बोरूडे, गोवर्धन अनर्थ व ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.
Post a Comment