बँक ऑफ बडोदाचे।सुरेश जायकर सेवानिवृत्त आ निलेश लंके यांच्या कोविड सेंटरला आर्थिक मदत देत जपली सामाजिक बांधिलकी कोपरगाव : बँक ऑफ बडोदाच्या कोपरगाव शाखेत 38 वर्षांपासून कार्यरत असणारे कर्मचारी सुरेश महादू जायकर सेवानिवृत्त झाले. मात्र, कोरोना महामारीच्या काळात त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत निवृत्तीचा कोणताही कार्यक्रम केला नाही. बँकेतील मोजक्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी जायकर परिवाराने आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या 1100 बेडच्या कोविड सेंटरला 11 हजार रुपयांची देणगी दिलीय (Bank of Baroda employee Suresh Jaykar donate 11 thousand to Covid Centre in Ahmednagar).
यावेळी बँकेचे व्यवस्थापक पुष्कराज गौतम म्हणाले, “कामाप्रति अत्यंत प्रामाणिक व योग्य पद्धतीने काम करण्याची हातोटी सुरेश जायकर यांच्यात आहे. ते बँकेच्या अनेक चढ उताराचे साक्षीदार आहेत. त्यांच्या कामाप्रति असलेल्या प्रामाणिकपणामुळे बँक ऑफ बडोदा पुढील वाटचाल करत आहे. सुरेश जायकर यांच्या सारख्या कुटुंबातील लोकांमुळे बँकेची आजपर्यंत भरभराट झाली आहे.”
38 वर्षात अनेक जबाबदारीचे कागदपत्रं जपली”
बँकेचे अधिकारी द्वारकाधिश ठाकूर म्हणाले, “सुरेश जायकर यांनी निस्वार्थ 38 वर्षे बँक ऑफ बडोडात सेवा दिली. कोणालाही न दुखावता गेल्या 38 वर्षात अनेक जबाबदारीचे कागदपत्र आजपर्यंत त्यांनी योग्य नियोजनाच्या आधारे जपून ठेवलीत. त्यांच्यात हे महत्त्वाचं कौशल्य होतं.”
“केलेली सेवा सयाजीराव गायकवाड यांच्या चरणी”
आपल्या निवृत्तीच्या क्षणी बोलताना सुरेश जायकर म्हणाले, “मी जी सेवा केली ती सयाजीराव गायकवाड यांच्या चरणी अर्पण केली. मला भगवंताने भरभरून दिले. सर्व शाखेतील सर्वांनी मला सहकार्य केले आहे. बँकेचा फायदा होईल यासाठी नेहमी प्रयत्न केले आहे. बँकेतील सर्व कागदपत्रं योग्य नियोजनाच्या आधारे शाखेला फायदा होईल त्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहे. प्रयत्न केल्याने सर्व काही साध्य करता येते. त्यामुळे माझ्यानंतर देखील सर्व शाखेतील लोकांना शिकवलेले आहे.”
आमदार निलेश लंकेंच्या कोविड सेंटरला 11 हजार रुपयांची देणगी
कोरोनामुळे कोणताही मोठा कार्यक्रम न करता जायकर कुटुंबाने आमदार निलेश लंके यांच्या कोविड सेंटरला 11 हजार रुपयांचा धनादेश दिलाय. यावेळी बँक व्यवस्थापक पुष्कराज गौतम, इंद्रप्रकाश चौधरी, शंकर दिवे, उत्कर्ष शर्मा, भारत साकीया, राहुल साळवे, आशिष बोडवाडे, द्वारकाधिश ठाकूर, गयाबाई माईंडळ, राजू गाडे, ज्ञानेश्वर शिंदे, दीपक पवार, राहुल जाधव, राजेंद्र माळी ,कुणाल जायकर, विनोद परदेशी,सागर पवार, शैलेश शिंदे, संग्राम वाणी,राहुल देवरे,विनोद शेटे,मोबिन खान, अर्चना जायकर, उपस्थित होते
Post a Comment