पिंपरी चिंचवड..(विशेष प्रतिनिधी) राम शिंदे युवा मंच मुळे मिळाला मेंढपाळाला न्याय .सर्वत्र अभिनंदन होत आहे.
धनगर समाजाचे मेंढपाळ बंधु .आनंद कोकरे यांची मेंढरे पिंपरी चिंचवड येथील कुदळवाडी भागातून जात असताना एक कार चालक भरधाव वेगात आला. वेगावर नियंत्रण न राहिल्याने गाडीवरील त्याचा ताबा सुटला आणि त्याने आनंद कोकरे या मेंढपाळ धनगर बांधवांच्या मेंढरांना धडक मारली. त्यात आपल्या मेंढपाळ बांधवांची दोन मेंढरे मारली गेली. सदर केस कुदळवाडी पोलीस चौकीत गेली. तो पर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील आपले धनगर समाज बांधव . .ना.प्रा. राम शिंदे युवा मंचचे राज्यअध्यक्ष पांडुरंग माने,गणेश खरात,किशोर केळे,अजित चौगुले, विलास महानवर, संतोष पांढरे, गजानन वाघमोडे,राम पांडुळे,देवा माने, हानुमत मोटे,आदी सर्व जण समाज बांधव पोहोचले होते. तिथे जाऊन पोलीस अधिकारी यमगर साहेब आणि त्यांचे सहकारी यांच्या मदतीने दोन्ही पार्टीना समोरा समोर बसवुन समेट घडवुन आणला. आपले मेंढपाळ मित्र बंधु आनंद कोकरे यांना नुकसान भरपाईची रक्कम रोख स्वरुपात देण्यास गाडी मालक अरुण कस्पटे यांना तयार केले. मेंढपाळ बंधु आनंद कोकरे आणि गाडी मालक अरुण कस्पटे यांच्यात समेट घडवुन आणला आणि हे प्रकरण जागेवर मिटवले याबद्दल.ना.प्रा. राम शिंदे युवा मंचचे राज्य अध्यक्ष पांडुरंग माने यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Post a Comment