वांबोरी(वार्ताहर) श्री संत सावता माळी युवक संघातर्फे जागतिक परिचारिका दिनानिमित्त सरकारी दवाखाना वांबोरी येथील परिचारकाचा सन्मान करण्यात आला रुग्णसेवेत प्रमुख प्रमुख भूमिका बजावणाऱ्या कोरोना काळातही अहोरात्र रूग्नसेवा करत आहेत. व ते काम उत्तमरित्या पार पाडत आहेत आपल्या कुटुंबापासून घरापासून लांब राहून त्या युद्धात उतरल्या आहेत त्यांच्या कार्याला सलाम करून संत सावता माळी युवक संघातर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी संघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अशोकराव तुपे, प्रदेश सोशल मीडिया प्रमुख दीपक साखरे. नितीन कुसमुडे, रवी पटारे, गोरक्षनाथ दुधाडे यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी डॉ.अंजली मंडलिक , ब्रदर सुशील देठे इन्चार्ज, विद्या कसबे, विजय कजबे, यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अशोक तुपे यांनी परिचारिकांनी कोरोना काळात प्रमुख योद्ध्याची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्याला आमच्या संघटनेचे वतीने आम्ही सलाम करतो असे प्रतिपादन केले.
Post a Comment