कर्जत (विशेष प्रतिनिधी)माजी पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांना कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्त हाक दिली आणि माजी मंत्री राम शिंदे साहेब यांनी आज कर्जत तालुक्यातील कुकडी पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. कर्जत तालुक्यातील बेनवंडी येथील ज्ञानदेव गदादे यांच्या शेतात उस, मका पाहून परिसरात भेट देऊन विचारपूस केली. त्यानंतर कोळवडी बाळासाहेब गोरे, रघुनाथ कवडे यांच्या शेतावर जाऊन त्यांची विचारपूस केली.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकरभाजपचे कर्जत तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे, माजी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर,प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे,गणेश पालवे किसान मोर्चा सरचिटणीस सुनील काका यादव,आदी मान्यवर उपस्थित होते. कर्जत तालुक्यातील कोव्हीड सेंटरला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.तसेच प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्याबरोबर कोविड संदर्भात चर्चा करून काही सूचना केल्या .माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या या दौऱ्यामुळे शेतकरी, सामान्य माणूस सुखावला आहे .आपला लोकप्रतिनिधी सुख दुःखात आपल्या सोबत असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
Post a Comment