वांबोरी प्रतिनिधी- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजनांना न्याय मिळावा यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यांची समाज सेवा पाहून 11 मे 1888 रोजी मुंब्रा येथे एका विशाल सभेमध्ये लाखोंच्या उपस्थितीत ज्योतिबा फुले यांना "महात्मा" ही पदवी बहाल करण्यात आली ज्योतिबा फुले यांना त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले या नावाने जगभरात ओळखले जाऊ लागले. महात्मा ही पदवी जनतेकडून मिळणारे संपूर्ण जगात महात्मा फुले पहिले समाज सुधारक आहे. त्यामुळे महात्मा दिनास महत्त्व आहे. 11 मे रोजी श्री संत सावता माळी युवक संघातर्फे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांनी दरवर्षी साजरा केला जातो. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग व सर्व नियमाचे पालन करून साध्या पद्धतीने पुष्पहार अर्पण करून "महात्मा दिन" साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुख दिपक साखरे, अहमदनगर जिल्हाअध्यक्ष अशोकराव तुपे, राहुरी तालुका सचिव भरत सत्रे, महिला आघाडीच्या वांबोरी शहराध्यक्षा जयश्रीताई व्यवहारे, शारदा साखरे आदी महिला व पुरुष उपस्थित होते.
Post a Comment