आद्य शंकराचार्यांचा १२३३वा जन्मोत्सव गुरुधामात साजरा

अज्ञानाचा अंधकार ज्ञानाच्या प्रकाशाने दूर होतो ही आद्य शंकराचार्यांची वाणी आजही आपल्याला आंतरिक चेतनाचा संदेश देते : स्वामी ओमकार महाराज                                      नगर : "अज्ञानाचा अंधकार दूर करणारा ज्ञानाच्या प्रकाशाचा मार्ग आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या जीवनप्रवासात भारत खंडाला दिला.आपल्याला आंतरिक चेतनाचा संदेश यातून मिळतो ",असे प्रतिपादन गुरुधामचे स्वामी ओमकार महाराज यांनी केले. अद्वितीय कर्मयोगी श्री आद्य शंकराचार्यांचा १२३३वा जन्मोत्सव रासनेनगर ( सावेडी ) येथील गुरुधामात उत्साहात सुरक्षितेचे मास्कसह सर्व नियम पाळून साजरा करण्यांत आला. यावेळी श्री स्वामी बोलत होते.         लोकजीवनात रुढ असलेले पंथ,जातीभेद न मानता लोंकाना समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवणारे आद्य शंकराचार्यांनी लोकांना तणावमूक्त अवस्थेतून बाहेर पडून निर्मळ आणि निर्भय मन ठेवायला सांगून त्यांना ज्ञानोपासनेचा मार्ग दाखवला. त्यांच्या अलौकिक बुध्दिमत्तेने विपूल साहित्य निर्मांण केले. त्यांनी वैदिक धर्माची प्रतिष्ठापना केली.भारत खंडात गोवर्धन पीठ ( ओरिसा ),शृंगेरी पीठ ( दक्षिण भारत ),शारदा पीठ(व्दारका) आणि ज्योतिर्मठ ( हिमालय ) या चार प्रमुख पीठांबरोबर कांची कामकोटी आणि काशी येथेही शंकराचार्यांनी पीठ स्थापन केले. या पीठांचे कार्य आजही सुरु आहे.                                         धर्म आणि राष्ट्र यांना एकत्र गुंफून अंतर्गत मतभेद दूर करण्याचा शंकराचार्यांनी प्रयत्न केला व "तमसो मा ज्योतिर्गमय" सिध्दांतानुसार त्यांनी प्रबोधन केले.असेही स्वामींनी यावेळी सांगितले.                                    प्रारंभी आद्य शंकराचार्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन विधिवत पादूकापूजनसह आरती करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी महाप्रसादाचा ( भंडारा ) लाभ घेतला. येत्या गुरुवार दि.२०मे पासून दर गुरुवारी पादूकापूजनाचा विधी आणि भंडारा होणार असून भक्तांनी सुरक्षितेचे सर्व नियम पाळून यात सहभागी व्हावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले                                   
   

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post