माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोपरगाव कोविड सेंटरला भेट

अहमदनगर(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगांव येथील संजीवनी कोविड सेंटर ला भेट दिली व  सर्व अत्याधुनिक सोयी असलेल्या स्पेशल वॉर्डचे उदघाटन केले.       याप्रसंगी मी त्यांना नगर जिल्ह्यातील कोरोना उपचारात  असलेल्या कमतरतेबाबत निवदेन दिले.
जिल्ह्यात करोना रुग्णाची वाढत असणारी टक्केवारी, ऑक्सिजनची कमतरता, व्हेंटिलेटरची कमतरता, झालेल्या मृत्यूचे ऑडिट करणे,रेमडीसेवर व औषधनाची कमतरता, हॉस्पटिल कर्मचाऱ्यांच्या व डॉक्टकरांच्या मागणीकडे दुर्लक्ष, तसेच जंबो कोविड सेंटर चे वीकेंद्रीकरण करणे.. अशा विविध परंतु अतिशय महत्वाच्या विषयात मी त्यांना लक्ष घालण्याची विनंती  केली असल्याचे भाजप युवा प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी  आमदार स्नेहलताताई कोल्हे, बिपिनदादा कोल्हे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहर अध्यक्ष भैया गंधे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर,डॉ. राजेंद्र पीपाडा, विनोद राक्षे ,कोपरगांवचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम पाचोरे, अविनाश पाठक, आकाश त्रिपाठी तथा अनेक मान्यवर उपस्थतीत होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post