शहरमधील कोविड सेंटर ची यादी प्रसिद्ध करावी :माजी शहरप्रमुख संभाजी कदम

 शहरमधील  कोविड  सेंटर ची यादी प्रसिद्ध करावी :माजी शहरप्रमुख संभाजी कदम
नगर-(प्रतिनिधी) नगर शहर व जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार उडविला आहे ,त्यातच दिवसेंदिवस पॉजिटीव्ह येणारे रुग्नाची संख्या वाढतच आहे .त्या प्रमाणात पुरेसे हॉस्पिटल ,बेड ,उपलब्ध होऊ शकत नाही .अशा परिस्थितीत रुग्नांचे ,नातेवाईकांचे हॉस्पीटल शोधताना एक-एक दिवस जात आहे .वेळ प्रसंगी हॉस्पिटल न मिळाल्याने रुग्ण दगावू शकतो .यावर आता प्रशासनाने खाजगी रुग्णालय ताब्यात घेतले आहे .परंतु या रुग्णालयात रुग्ण गेल्यावर त्यास जागा शिल्ल्क नाही असे सांगितले जाते .यावर प्रशासनाने सर्व खाजगी रुग्णालयात माहिती सुविधा केंद्र सुरु केल्यास  रुग्णाला मदत मिळू शकेल .तसेच मनपाच्या वतीने शहरात किती कोविड सेंटर चालू केले व कोणत्या ठिकाणी किती बेड व्यवस्था याची माहिती जाहीर करणे गरजेचे आहे ,त्यामुळे सामान्य रुग्णाला मोठा दिलासा मिळू शकतो अशा मागणीचे निवेदन माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी मनपा आयुक्त यांना पाठविलेले निवेदनात म्हटले आहे     



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post