मुळा नदीवरील बंधारे भरावेत: मुळा थडी पाणी कृती समितीची मागणी


राहुरी/प्रतिनिधी 
     राहुरी तालुक्यातील मुळा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे मुळा धरणातून पाणी सोडून भरण्यात यावे अशी मागणी मुळा थडी कृती समितीच्या वतीने मुळा पाटबंधारे विभागाला करण्यात आली आहे.शुक्रवारी दुपारी या समितीच्या शिष्टमंडळाने मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांना हे निवेदन दिले आहे.
    सदर निवेदनात म्हटले आहे की, सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने नदी मधील पाणी आटले आहे सर्व बंधारे ही कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे मुळा नदीच्या परिसरात असणाऱ्या बहुतांशी भागांमध्ये पाण्याची तीव्रता भासू लागली आहे. त्यामुळे तालुक्यातील मुळा नदीवरील असणारे डिग्रस,वांजोळपोई, मानोरी, मांजरी
आदि बंधा-यात लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे अशी समितीचे अध्यक्ष दत्तात्रय घोलप,नानासाहेब जुंधारे,विलास सैंदोरे, विठ्ठल जाधव, बाळासाहेब नवगिरे, भाऊसाहेब विटनोर, संजय पवार आदींने केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post