राम शिंदे यांनी होळकर घराण्यातील परंपरा कायम ठेवत केली अनोखी मदत

                                जामखेड :(वार्ताहर) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नववे वंशज प्रा राम शिंदे यांनी होळकर घराण्यातील परंपरा कायम ठेवत जामखेड शहरातील कोविड सेंटरला  मदतीचा हात दिला आहे.या उपक्रम मधील 166 ऑक्‍सिजन सिलिंडर मुुुळे  रुग्णांना मोठी मदत  झाली आहे. ग्रामीण आरोग्य प्रकल्पांतर्गत हे सेंटर सुरू असून, या प्रकल्पाचे संचालक डॉ. रवी आरोळे आणि डॉ. शोभा आरोळे ही भावंडं कोविड सेंटरचे काम पाहतात. शासनाच्या माध्यमातून तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी पी. पी. कोकणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे हे समन्वयकाच्या भूमिकेतून नियोजनात सक्रिय आहेत. 

मंत्री शिंदे यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आणि ते पुन्हा सक्रीय झाले आहेत. जामखेड भाजपच्या वतीने 71 सिलिंडरचा पुरवठा संबंधित कोविड सेंटरला केला. नगरपालिकेच्या पाणीपुरवठा समितीचे सभापती अमित चिंतामणी यांनी स्वतःच्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून 40 सिलिंडरचा पुरवठा केला. ज्योतीक्रांती मल्टिस्टेटचे अध्यक्ष आजिनाथ हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी 55 सिलिंडर दिले. 

सिलिंडरची हवी मदत 

येथील कोविड सेंटरला दररोज 90 ऑक्‍सिजन सिलिंडरची गरज पडते. येथील गरज लक्षात घेऊन विविध क्षेत्रातील दानशुरांनी, संस्थांनी मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. तसेच येथील विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर जनरेटरकरीता इंधनाची गरज आहे. त्यासाठी पेट्रोलपंप चालकांनी मदत करावी, अशी अपेक्षा कोविड सेंटरच्या व्यवस्थापनेकडून होत आहे. 

शेतकरी करतात अन्नधान्य पुरवठा 
कोविड सेंटरसाठी विनामूल्य उपचार घेऊन बरे झालेले शेतकरी घरी गेल्यानंतर स्वयंस्फूर्तीने अन्न धान्याचा पुरवठा करीत आहेत. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र सुरवसे, तालुकाध्यक्ष अजय काशीद, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काशीद, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, भाजीपाला व्यापारी संघटनेने यांनीही कोविड सेंटरला अन्नधान्य, किराणा, भाजीपाला व इतर अनुषंगिक साहित्याचा पुरवठा केला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post