दातीर कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणार: माजी गृहमंत्री प्रा राम शिंदे

राहुरी (प्रतिनिधी)येथील दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहिदास दातीर यांच्या  हत्येची चौकशी करून या हत्याकांडातील मास्टरमाईंड शोधून त्यांना कठोर शासन करण्यासाठी दातीर कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणार असल्याची    भावना माजी गृहमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा राम शिंदे व्यक्त केली.
राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांची गेल्या दहा दिवसापूर्वी   राहुरीतील बाजारपेठेतुन  भर दुपारी समाजकंटकांनी अपहरण करून  हत्या केली होती .या कुटुंबाच्या भेटीला प्रा राम शिंदे आले होते. यावेळी त्यांच्या समवेत माजी मंत्री शिवाजीराव  कर्डीले, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे. पत्रकार निशांत दातीर, आदी मान्यवर उपस्थित होते.        या घटनेबद्दल तीव्र संताप आणि चिंता व्यक्त करून माजी मंत्री  प्रा राम शिंदे म्हणाले की ,एका पत्रकाराचे दिवसाढवळ्या अपहरण करून त्याची निर्दयपणे हत्या होते ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाच्छनास्पद आहे.दातीर यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून राहुरी परिसरातील अनेक गैरकृत्य उजेडात आणली होती.लोकांच्या हक्कासाठी लढताना अनेक हितसंबंधी त्यांचे शत्रू झाले होते.दातीर यांच्या  लेखणीमुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले गेले आहेत अशाच धेडांनी त्यांची हत्या घडवून आणली असावी असा अंदाज   व्यक्त करत आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे. मयत रोहिदास दातीर यांच्या पत्नीचा पुरवणी जबाब नोंदवला पाहिजे. या  हत्येनंतर फरार असलेल्या आरोपींना अटक करण्यात आली पाहिजे. दातीर परिवार हत्येनंतर भयंकर भीतीदायक वातावरणातुन जात आहे मात्र आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे सांगून आजच. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन तपासाला गती देण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post