अहमदनगरच्या सायकल स्वारांनी घातली माऊंट एव्हरेस्टला गवसणी

हॉल ऑफ फेम"  मध्ये समाविष्ट 
अहमदनगर( प्रतिनिधी)येथील चार सायकलिस्ट यांनी माऊंट एव्हरेस्ट च्या उंची इतकी सायकल चालवून माऊंट एव्हरेस्ट ला गवसणी घातली त्यामुळे त्यांचे नाव हॉल ऑफ फेम मध्ये नोंदविले गेले आहे. 
शनिवार दिनाकं २७ मार्च २०२१ रोजी अहमदनगर येथील सायकलिस्ट शरद काळे पाटील , उदय टीमकरे ,  सागर काळे  व शशिकांत आवारे ह्या चार सायकल स्वारांनी जगातील सर्वात उंच असलेल्या माउंट एव्हरेस्ट च्या उंची इतकी सायकल चालविल्यामुळे त्यांचे नाव  "हॉल ऑफ फेम" मध्ये नोंदविले गेले आहे .

जगातील सर्वात अवघड चॅलेंज  हे पाच सायकल स्वारांनी स्वीकारले होते. सुयोग  मोकाटे यांना काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे राईड पूर्ण करता आली नाही.

जगात सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट असून त्याची उंची ८८४८ मीटर (२९०२९ फूट) आहे.  सायकल स्वाराने हे अंतर एखादया  टेकडी अथवा डोंगरावर वर - खाली करून तितकी उंची गाठायची असते. हे पूर्ण केल्यास त्याचे नाव '' हॉल ऑफ फेम " मध्ये नोंदविले जाते.

पाचही सायकल स्वरांनी शनिवारी सकाळी ६ वा पांढरीपूल येथील हनुमान मंदिरा पासून सुरुवात  केली होती. ७५ वेळा घाट सायकलवरवर खाली वर केला.  
घाट्याच्या पायथ्यापासून उंची १२५ मीटर आहे. त्या मुळे सायकलस्वरांना ८९००/१२५ = ७२ वेळा घाट चढ उतार करावा लागला. हे करण्यास काळे पाटील यांना ३७ तास ५८ मी लागले तर सागर काळे यास 3८ तास व उदय टीमकीरे यास ३८ तास २९ मिनिटे लागले.  ही उंची गाठण्यासाठी त्यांनी ३५० किमी सायकल चालविली. विशेष म्हणजे सायकल स्वाराने मध्ये कुठेही झोप घेता कामा नये अशी अट घातली गेली होती. रात्रीच्या वेळी सायकल चालविताना घाटामध्ये चोरांपासून सायकल स्वरांना त्रासही झाला . एमआयडीसीचे पोलीस उपनिरीक्षक श्री युवराज आठरे साहेब यांनी चोख बंदोबस्त केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. 

आजपर्यंत जगातील १५८३४  स्पर्धकांनी ही चॅलेंज पूर्ण केली आहे.भारतातील फक्त १५२ स्पर्धकांनी ही चॅलेंज पूर्ण केली आहे.  त्यात १३५ पुरुष तर १७ महिला आहेत. 
मागे दोन महिन्यापूर्वी पुण्यामध्ये ६००  कि.मी. ची बी.आर.एम करत असताना  एवरेस्ट्टीगबद्दल  सायकलिस्ट श्रीमती कांचन बोकील यांच्याकडून माहिती मिळाली . काळे पाटील हे मागील गेल्या दोन वर्षापासून सह्याद्री क्लासिक ह्या महाराष्ट्रातील सर्वात अवघड समजल्या जाणारया सायकलिंग स्पर्धेत भाग घेऊन वेळेत पूर्ण केली होती . त्यामुळे आपण ही मोहीम फत्ते करू शकू असा आत्मविश्वास काळे पाटील यांना होता. मागील तीन वर्षापासून काळे पाटील सायकलिंग मधील सुपर रेंडूनियर SR आहेत.  त्यांनीच इतर चार सायकल स्वारांना या मोहिमेबद्दल सांगून त्यांना भाग घेण्यास प्रवृत्त केले.  विशेष म्हणजे हे चारही सायकलस्वार अकरावी व बारावी या वर्गात शिकत असून त्यांनी नुकताच सायकलींचा श्री गणेशा केला आहे .
 
भविष्यात सायकलिंग मध्ये नगर जिल्ह्याचे नाव उंच पातळीवर नेण्यासाठी हे सायकलवीर नक्कीच प्रयत्न करतील अशी आशा काळे पाटील यांनी व्यक्त केली.
ह्या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी अनेकांनी सायकल , मोटार सायकल किंवा फोर व्हिलर घेऊन सायकल स्वारांन बरोबर काही अंतर प्रवास केला. त्यामुळे सायकल स्वरांचे मनोबल वाढले व त्यांचा आनंद द्विगुणित झाला. 

सदर काळात सायकल स्वरांना चहा , बिस्कीट, चिक्की, चॉकलेट , फळे , काजू,  बदाम , खजूर , ताक व लस्सी अशा स्वरूपात अनेकांनी भेटवस्तू दिल्या.
सायकल स्वारांनी ही मोहीम फत्ते केल्यामुळे त्यांचे नाव "हॉल ऑफ फेम " मध्ये नोंदविले गेले. पहिल्याच प्रयत्नात नगर जिल्ह्यातील चार  सायकलस्व|रांनी यामध्ये प्रवेश करून नगरचा श्रीगणेशा केला आहे. 

अहमदनगरच्या अनेक सायकलिस्टनी त्यांचे समक्ष भेटून अभिनंदन केले.  ग्रामीण भागातील या चार सायकलपटू ने केलेली कामगिरी निश्चितच अभिमानास्पद आहे. अहमदनगर सायकलिस्ट साठी ही एक भूषणावह गोष्ट आहे असे उदगार नगर सायकलिस्ट असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य श्री चंद्रशेखर मुळे (काका) यांनी काढले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post