माजी आमदार स्व.अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त अनामप्रेम संस्थेस मिष्ठान्न भोजन

 


अनामप्रेम संस्थेतील मुलांना मिष्ठान्न भोजन


वंचित घटकांसाठी काम करण्याची आवश्यकता-सुरेखा कदम


     नगर - स्व.अनिल राठोड यांनी सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कायम पुढाकार घेतला आहे. त्यांचे कार्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी राहील. त्यांचे हे कार्य आता आपण पुढे सुरु ठेवणे आवश्यक आहे. यासाठीच त्यांच्या जयंती निमित्त  सामाजिक उपक्रमातून राबविण्यात येत आहे. समाजातील वंचित घटकांसाठी काम करुन त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचे काम आपणास करावयाचे आहे, असे प्रतिपादन माजी महापौर सुरेखा कदम

माजी आमदार स्व.अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यावतीने अनामप्रेम संस्थेस मिष्ठान्न भोजन देण्यात आले. याप्रसंगी युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी महापौर सुरेखा कदम, संजय शेंडगे, प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, दत्ता कावरे, अशोक दहिफळे, शिवाजी कदम, आशा निंबाळकर आदि उपस्थित होते.याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, स्व.अनिल राठोड हे शिवसैनिक व सर्वसामान्यांचे प्रेरणास्थान होते. सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याची त्यांची तळमळ सर्वश्रुत आहेत. त्यांनी नेहमीच तळगळातील लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कायम पुढाकार घेतला, त्यांचे हे कार्य कोणीही विसरु शकत नाही. त्यांनी कायम शिवसैनिकांना ताकद देण्याचे काम केले. जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देऊन त्यांच्या स्मृती कायम ठेवण्याचा प्रयत्न यानिमित्त केला आहे.याप्रसंगी विक्रम राठोड, संजय शेंडगे आदिंनी मनोगत व्यक्त केले. शेवटी आशा निंबाळकर यांनी आभार मानले.  रमेश परतानी, पप्पू भाले, अप्पू बेद्रे, संतोष तनपुरे, सोनू सैंदाणे, सुमित धेंड, अजित कुलकर्णी आदि.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post