अहमदनगर डिस्ट्रिक्ट नॅशनल पोस्टल को ऑ क्रेडिट सोसायटी ची ऑनलाइन वार्षिक सभा संपन्न

अहमदनगर डिस्ट्रिक्ट नॅशनल पोस्टल को ऑ क्रेडिट सोसायटी ची ऑनलाइन वार्षिक सभा संपन्न

अहमदनगर: अहमदनगर डिस्ट्रिक्ट नॅशनल पोस्टल को ऑ क्रेडिट सोसायटीची 5 वी वार्षिक सर्वसाधारण  सभा  ऑनलाइन पध्दतीने झूम अँपवर संपन्न झाली.
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर मागील आर्थिकवर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रतिवर्षप्रमाणे संपन्न होऊ शकली नव्हती.नुकतेच सहकार विभाग महाराष्ट्र शासन यांचे परिपत्रकानुसार सभा या ऑनलाइन पध्दतीने घाव्यात असे आदेश आल्याने संस्थेची वार्षिक सभा ही ऑनलाइन पध्दतीने आयोजित केली होती. प्रथमच सभा ऑनलाइन होत असल्याने सभासदामध्ये मोठी उसुकता होती. सभेस मोठया संख्येने सभासद ऑनलाइन जॉईन झाले होते.
सभेच्या अध्यक्षपदी  शिवाजी जावळे हे होते.
संस्थेचे कार्यकारी संचालक श्री सचिन गायकवाड यांनी सभेच्या नोटीसचे वाचन करून ,संस्थेचे आर्थिक पत्रके हे सभेपुढे  सादर केले.
संस्थेचे जेष्ठ सभासद   संतोष यादव यांनी  सभेस मार्गदर्शन करताना, संस्थेच्या  आर्थिक पत्रके  सभासदासमोर मांडून त्या विषयी सविस्तरपणे मार्गदर्शन केले.ही  संस्था  नवीन असूनही अल्पावधीच स्वभाडवलाकडे वाटचाल करत असून, सद्य स्थितीत उपलब्ध निधी मधून  संस्था ही  सभासदास कमीत कमी व्याजदरामध्ये  कर्ज उपलब्ध करून देत असून,सदैव सभासद हितास प्राधान्य देत आहे. विदमान संचालक मंडळ अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज करून असून ,आपण आजवर जे सहकार्य केले तसेच सहकार्य या पुढेही करा असे आवाहन केले.
सभेस उपाध्यक्ष  नामदेव डेंगळे, संचालक   प्रकाश कदम,  राधाकिसन मोटे 
प्रदिप सूर्यवंशी, बापू तांबे, संस्थेचे लिपिक दंडवते हे उपस्थित होते. 
सभेचे सूत्रसंचालन बापू तांबे तर आभार  नामदेव डेंगळे यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post