धनगर समाजातील चाणक्यांचा विजय होताना दिसत आहे.
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत कोणत्याही प्रस्थापित पक्षाच्या ध्यानीमनी नसलेल्या धनगर समाजाच्या आक्रोशाने व पक्षविरहीत एकीकरणाने राजकीय पक्षांच्या निवडणूक धोरणाचे चक्र एकदम उलटे म्हणजे 360 डिग्रीत फिरतांना दिसत आहे.
विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा राम शिंदे यांच्या रूपाने धनगर समाजाला उमेदवारी देण्या पर्यंत आला आहे तर सत्तारुढ पक्षाला आपला उमेदवार ठरवणे मुश्कील झाले आहे.
याचे सारे श्रेय जाते ते सोलापूर जिल्ह्यातील समाजबांधवांना व या मोहिमेची आखणी करणारे,बुद्धीबळाचा डाव टाकून मुत्सद्दी फासे टाकणाऱ्या समाजधुरीनांना,समाजातील विचारवंताना व त्यांना नैतिक पाठबळ देणाऱ्या सोलापूर ते नागपूर च्या समाजबांधवांना.
पंढरपूर मंगळवेढ्याची निवडणूक आता फक्त सोलापूर जिल्ह्यातील न राहता तिचे उभ्या महाराष्ट्राची चळवळ होण्यासारखे वातावरण आज तयार झाले आहे.
धन्यवाद महाराष्ट्रातील समाजाच्या या व्यापक दृष्टीकोनाला व समाजातील सर्वच विचारवंताना आपण समाजाला दखलपात्र करण्यात यशस्वी होतांना दिसत आहात.
हार-जितचा फैसला काहीही असो परंतु धनगर समाज कडवे आव्हाहन उभे करून अर्धी लढाई आजच जिकला आहे.
येत्या काही दिवसात महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यातून सामान्य समाजबांधव,विचारवंत, तरुण, संतमंडळी पंढरपूर कडे रवाना होतील व समाजाच्या अस्मितेच्या लढाईत आपला खारीचा वाटा उचलतील.
लेखक लिहितील, तरुण प्रचार करतील,कुणी पुढारी प्रचारात आघाडी घेतील तर काही समाजहिताच्या हेतूने गप्प राहतील.
सर्व पक्षीय धनगर नेत्यांना व कार्यकर्त्यांना वाटते की पंढरपूर मंगळवेढ्यात धनगरांचा आमदार व्हावा.
भविष्यात पंढरपूर-मंगळवेढा या नावाचा पँटर्ण महाराष्ट्रात उदयास येण्याची दाट शक्यता आहे.
धनगर समाज राजकीय दृष्ट्या प्रगल्भ होताना दिसत आहे व याचे श्रेय समाजातील सर्वच ज्ञात अज्ञात, लहान मोठ्या चाणक्यांना जाते.
Post a Comment