अहंमदनगर (प्रतिनिधी)माजी केंद्रीय मंत्री स्व. दिलिपजी गांधी यांचे नुकतेच निधन झाले आहे. आज माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या देवेंद्र या निवासस्थानी राष्ट्रीय समाज पक्ष संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री.महादेवजी जानकर यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंदरे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. .गांधी कुटूंबाची भेट घेऊन माजी नगरसेवक सुरेन्द्रजी गांधी यांचे सांत्वन करून रासप जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे यांनी माजी मंत्री महादेव जानकर यांच्याशी बोलणे करून दिले. यावेळी रासपचे पदाधिकारी उपस्थित होते.रासप, भाजपच्या घटक पक्ष म्हणून काम करत आहे. अनेक निवडणुकीत माजी मंत्री दिलीप गांधी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. रासपची स्थापना
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी झाली .पक्षाच्या आजवरच्या प्रवासात लोकनेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे मार्गदर्शन लाभले होते. केंद्रीय मंत्री दिलीप गांधी हे नेहमीच रासपच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांना नेहमीच सन्मान देत असत अशी भावना जिल्हा अध्यक्ष नानासाहेब जुंदरे यांनी व्यक्त केली
Post a Comment