कोरोना काळातही निशांत दिवाळी अंकाची प्रगती कौतुकास्पद:आमदार गोपीचंद पडळकर


 कोरोना काळातही  निशांत दिवाळी अंकाची प्रगती कौतुकास्पद:आमदार गोपीचंद पडळकर                    

अहमदनगर (प्रतिनिधी)  अहमदनगर जिल्ह्यातून गेली वीस वर्षे प्रकाशित होत असलेल्या निशांत दिवाळी अंकाने यावर्षी जागतिक कोरोना महामारीचे संकट उभे असतानाही आपला दर्जा टिकून ठेवत परंपरा कायम ठेवली त्यामुळे निशांत दिवाळी अंकाची टीम निश्चितच कौतुकास्पद असून त्यांची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही, असे प्रतिपादन आमदार  गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले. 



 औरंगाबाद येथे जात असताना अहमदनगर येथील शासकीय   विश्रामगृह  आमदार पडळकर थांबले   होते .त्यावेळी ते बोलत होते .



यावेळी संपादक  निशांत दातीर यांनी गेल्या २० वर्षांपासून नगर जिल्ह्यातून प्रकाशित होत असलेल्या निशांत  दिवाळी अंकाचे प्रकाशन यापूर्वी माजी केंद्रीय कृषी मंत्री  शरदचंद्रजी पवार साहेब,उपमुख्यमंत्री  गोपिनाथ मुंडे,माजी मंत्री  प्रा.राम शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती देत   निशांत दिवाळी अंकाची 20 वी आवृत्ती प्रसिद्ध झाली असून, डिजिटलायझेशन व इंटरनेटच्या युगातही प्रिंट मिडियाला महत्व देऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रिंट स्वरुपात प्रसिद्ध करण्यात आला आहे असे प्रास्ताविकात सांगितले.




     पुढे बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की,' तब्बल अकरा महिन्यांहून अधिक जगभरात कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे  यंदा अनेक प्रकारचे निर्बंध होते .या परिस्थितीत कुठेही तडजोड न करता २०वर्षांची परंपरा निशांत दिवाळी अंकाने यंदाही कायम ठेवत  वाचकांना दिलेल्या साहित्य कौतुकास्पद आहे.अंकाच्या मुखपृष्ठावरील मास्कचे चित्र टाकून जागृती करणे हे उल्लेखनीय असेच काम आहे, असे स्पष्ट करतानाच त्यांनी  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
            







0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post