प्रतिनिधी, नगर
भारतीय जनता पक्षाचे व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कपबशी हे चिन्ह मिळाले आहे. मात्र कपबशी हे चिन्ह राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) चे समजले जाते. हेच चिन्ह जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कर्डिले यांना मिळाल्यामुळे त्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या बँकेच्या 21 पैकी 17 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर, उर्वरीत चार जागांसाठी 18 फेब्रुवारीला मतदान होत आहे. या चार जागांमध्ये कर्जत मतदार संघात अंबादास पिसाळ विरुद्ध मिनाक्षी सांळूके, नगर मतदारसंघात माजी मंत्री शिवाजी कर्डिले विरुद्ध सत्यभामाबाई बेरड, पारनेर मतदारसंघात उदय शेळके विरुद्ध रामदास भोसले तर बिगर शेती संस्थाच्या मतदार संघात प्रशांत गायकवाड विरुद्ध दत्तात्रय पानसरे यांच्यामध्ये लढत होत आहे. या सर्वांचे चिन्ह वाटप आज, शुक्रवारी करण्यात आले आहे. त्यामध्ये कर्डिले यांना कपबशी हे चिन्ह देण्यात आले आहे. हे चिन्ह रासप पक्षाचे समजले जाते. आता हेच चिन्ह भाजपचे कर्डिले यांना मिळाल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
...
जानकरांसोबत कर्डिले यांचे सलोख्याचे संबंध
रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासोबत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे सलोख्याचे संबंध राहिले आहेत. तसेच रासप हा भाजपचा मित्र पक्षच आहे. त्यामुळे आता कर्डिले यांनी कपबशी चिन्हाला मुद्दामच पसंती दिल्याचेही बोलले जात आहे.
...
असे झाले चिन्ह वाटप
कर्जत मतदारसंघ -
1) अंबादास पिसाळ - विमान
2) मिनाक्षी सांळुके - कपबशी
नगर मतदारसंघ -
1) शिवाजी कर्डिले - कपबशी
2) सत्यभामाबाई बेरड - छत्री
पारनेर मतदारसंघ -
1) रामदास भोसले - विमान
2) उदय शेळके - कपबशी
बिगर शेती संस्थाचा मतदार संघ
1) प्रशांत गायकवाड - कपबशी
2) दत्तात्रय पानसरे - विमान
....
Post a Comment