सोनसाखळी चोरीच्या पार्श्‍वभूमीवर प्रबोधनात्मक फलकाचे अनावरण


सोनसाखळी चोरीच्या पार्श्वभूमीवर          प्रबोधनात्मक    फलकाचे अनावरण

काळजी घ्या सोन्यासारखा जीव वाचवा

-पो.नि.गायकवाड

       नगर - अनेक घटनांमधून अनेक ठिकाणी सोनसाखळी चोर्यांमधून महिलांना जीव गमवावे लागले तर काहींना अपंगत्व आले आहेआपला जीव हा सोन्यापेक्षा मौल्यवान आहेतेव्हा महिलांनी सोने घालून फिरतांना काळजी घ्या  आपला सोन्यासारखा जीव वाचवाअसे आवाहन तोफखाना पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल गायकवाड यांनी केले.

     सावेडी भागातील उपनगरात गेल्या अनेक दिवसांपासून सोन साखळ्यांची धूम स्टाईलने चोर्या होत आहेतअहमदनगर पोलिस दलातर्फे दक्ष नागरिक  सुरक्षित परिसर होण्यासाठी प्रबोधनात्मक फलक लावण्यात आलेश्रीराम चौकातील फलकाचे अनावरण श्री.गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलेयाप्रसंगी महिला  नागरिकांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

     याप्रसंगी नगरसेवक सुनिल त्र्यंबकेपोलिस उपनिरिक्षक समाधान सोळंकेसहाय्यक फौजदार आढावयोगेश पिंपळेअमित गाडेनिखिल त्र्यंबकेदत्तात्रय कोकाटेहरिभाऊ संतअण्णा आदकोटीसंजय लावंड आदिंसह श्रीराम चौकातील कार्यकर्ते उपस्थित होते.

     श्री.गायकवाड पुढे म्हणालेमहिलांनी थोडी सावधानता वाळगून सुरक्षितपणे दागिने सांभाळले तर या घटना घडणार नाहीतगळ्यातील दागिने स्कार्पओढणीपदराने झाकल्यास चोरट्यांना हिसकविता येणार नाहीसहजपणे ओढता येणार नाहीमहिलांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे म्हणजे समोरुन येणार्या मोटार सायकलस्वाराच्या हाताच्या अंतरपेक्षा जास्त अंतर ठेवून चालावेकोणी पत्ता विचाराण्यासाठी थांबल्यास अनोळखी व्यक्तीशी बोलणे टाळावे किंवा सुरक्षित अंतर ठेवून बोलावेअसे सांगितले.

     नगरसेवक त्र्यंबके म्हणालेआपणच आपली काळजी घ्यावीरात्रीच्यावेळी महिलांनी निर्जनस्थळी एकटे जाणे टाळावेगर्दीच्या  मोठ्या रस्त्याचा वापर करावाकोणी अनोळखीसंशयित तरुण वाहन चालवतांना दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्याअसे सांगून पोलिसांनी प्रबोधन फलक लावून जनजागृती केलीत्यावरील नंबर नागरिकांनी घेऊन कुठे घटना घडल्यास बघ्याची भुमिका  घेता संपर्क कराअसे केले तर या घटना घडणार नाहीतअसे ते म्हणाले.

     चौकाचौकात लावलेल्या या फलकांचे नागरिक वाचन करीत असूनपोलिसांना सहकार्य करण्याची भुमिका घेतीलअसा विश्वास पो.उपनिरिक्षक समाधान सोळंके यांनी व्यक्त केला.

     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post