भाजपचे हे माजी मंत्री झाले सकि‘य

 भाजपचे हे माजी मंत्री झाले सकि‘य


प्रतिनिधी, नगर 


भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा.राम शिंदे हे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत चांगलेच सकि‘य झाले आहे. आज, गुरुवारी प्रा.राम शिंदे यांनी स्वतः जिल्हा उपनिबंधक र्कायालयात येत जग्गनाथ राळेभात यांचा अर्ज भरला आहे. राळेभात यांच्यासाठी सूचक म्हणून स्वतः राम शिंदे यांनी स्वाक्षरी केली आहे. 

अहमदनगर जिल्हा मध्यर्वती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रकि‘या सुरू आहे. आज, गुरुवारी माजी आमदार वैभव पिचड, माजी चेअरमन सीताराम गायकर, माजी आमदार राहुल जगताप, अंबादास पिसाळ, अण्णासाहेब शेलार यांच्यासह जगन्नाथ राळेभात यांनी र्अज भरला आहे. मात्र, यामध्ये राळेभात यांचा अर्ज भरताना माजी मंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीची चांगलीच र्चचा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिंदे हे स्वतः आज राळेभात यांचा र्अज भरताना उपस्थित होते. यावेळी त्यांनी राळेभात यांच्या र्अजावर सूचक म्हणूनही स्वाक्षरी केली आहे. आता राळेभात यांच्यासह भाजपच्या इतर उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रा.राम शिंदे नेमकी काय खेळी खेळणार याकडेही राजकीय र्वतुळाचे लक्ष लागले आहे. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post