जामखेड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी चे निर्विवाद वर्चस्व-प्रा.राम शिंदे
जामखेड(उद्धव उलगुंडे) मागील १महिन्यापासून ग्रामपंचायत निवाडणुकींची रणधुमाळी सुरु होती.भा.ज.पा .च्या कार्यकर्त्यांच्या अविरत मेहनतीच्या जोरावर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जोरदार टक्कर दिली व विजयश्री खेचून आणली.
जामखेड तालुक्यातील एकूण ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. भारतीय जनता पक्षाचे ४१७पैकी२०३ सदस्य निवडून आले.४९ ग्रामपंचायती पैकी २३ ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाची निर्विवाद सत्ता आली असून १०ग्रामपंचायती मध्ये भाजपा स्थानिक आघाड्या सोबत सत्तेत आली आहे.उर्वरित१६ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस सह तत्सम पक्ष्यांना मिळाल्या आहेत .
हि माहिती मा.मंत्री तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.प्रा.राम शिंदे साहेब यांनी काल संध्याकाळी चौंडी येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी भाजपचे जामखेड ता अध्यक्ष मा अजयदादा काशिद,मा नगराध्यक्ष मा नामदेव (देवा) राऊत, मा डॉ भगवानदादा मुरुमकर, उपसभापती मा रविंद्र सुरवसे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख .मा सचिन पोटरे, जिल्हा परिषद सदस्य मा सोमनाथ पाचरणे, मा अनिल लोखंडे, सरपंच मा काकासाहेब धांडे,मा प्रविनशेठ चोरडीया , नगरसेवक मा सोमनाथ राळेभात,मा संजयबापू कार्ले, युवा मोर्चाचे अध्यक्ष मा पै शरद दादा कार्ले,उपाध्यक्ष मा मोहन(मामा)गडदे,आपटी मा सरपंच मा नंदकुमार गोरे, मा पांडुरंग उबाळे, सरचिटणीस मा लहु शिंदे, अल्पसंख्या ता अध्यक्ष मा डॉ अल्ताफ शेख, मा अंकुश शिंदे, मा संचालक,मा पोपट (नाना) राळेभात, मा शरद हजारे, मा शाहरूख तांबोळी,सोशल मिडीया प्रमुख उद्धव हुलगुंडे सह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment