सौ.कादंबरी खोमणे या राज्यस्तरीय कर्तुत्ववान महिला नारीरत्न गौरव पुरस्काराने सन्मानित
नगर - मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्या सौ.कादंबरी रमेश खोमणे यांना राज्यस्तरीय ‘कर्तुत्ववान महिला नारीरत्न गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कान नगर येथे पोलिस उपाधिक्षक संदिप मिटके यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी विशाल लाहोटी, मंजुषा खोमणे, आरजे शर्वरी आदि उपस्थित होते.
याप्रसंगी संदिप मिटके म्हणाले, आपण करत असलेल्या कामातून समाजासाठी योगदान दिले पाहिजे. समाजातील गरजू लोकांसाठी काम केले पाहिजे. आपण करत असलेल्या कामाची दखल ही घेतली जातेच. सौ.कादंबरी खोमणे यांनी केलेले कार्य महिलांसाठी प्रेरणादायी असेच आहे, असे सांगून शुभेच्छा दिल्या.
सौ.कादंबरी खोमणे या वास्तूतज्ञ असून, विविध उपक्रमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
-------
कृपया प्रसिद्धीसाठी आपला
फोटो - सौ.कादंबरी रमेश खोमणे यांना राज्यस्तरीय ‘कर्तुत्ववान महिला नारीरत्न गौरव पुरस्कार’ प्रदान करतांना पोलिस उपाधिक्षक संदिप मिटके. याप्रसंगी विशाल लाहोटी, मंजुषा खोमणे, आरजे शर्वरी आदि
Post a Comment