रोटरी क्लब अहमदनगर इंटेग्रिटीच्यावतीने प्रगत विद्यालयास खुर्च्या प्रदान


 रोटरी क्लब अहमदनगर इंटेग्रिटीच्यावतीने प्रगत विद्यालयास खुर्च्या प्रदान

नगर - गांधी मैदान  येथील दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटेग्रिटीच्या वतीने डिजिटल रूम करण्याकरता रोटरी क्लबच्यावतीने वीस खुर्च्या प्रदान करण्यात आल्या. रोटरी क्लबचे अध्यक्ष रफिक मुन्शी, संस्थेचे सेक्रेटरी सुनील रुणवाल, रोटरी क्लबचे सचिव सुयोग झंवर, प्रो.चेअरमन डॉ.आसाराम खाडे, डॉ.रिजवान शेख, जावेद शेख, कर्मयोगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शफी जहागिरदार मार्कंडेय विद्यालयाचे सचिव प्राचार्य बाळकृष्ण सिद्धम, प्राचार्य सुनिल पंडित आदि उपस्थित होते.

याप्रसंगी रफिक मुन्शी म्हणाले, प्रगत विद्यालयाने अल्पावधीत शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी गरुड भरारी घेतली असून विद्यालयामध्ये दोन  संगणकाच्या अद्यावत लॅब असून आता विद्यालयमध्ये डिजिटल हॉलची निर्मिती करण्यात येत असल्याने ही रोटरी क्लब कडून अल्पशी भेट देण्यात येत असल्याचे मुन्शी यांनी सांगितले.

      यावेळी संस्थेचे सेक्रेटरी मा .सुनील रुणवाल यांनी संस्था व सर्व शैक्षणिक बाबीचे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य सुनील पंडीत यांनी केले तर सूत्रसंचालन दिलीप रोकडे यांनी केले. शेवटी आभार प्रा. गौतम कराळे यांनी मानले यावेळी विद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारवृंद उपस्थित होते.

---------

कृपया प्रसिद्धीसाठी प्राचार्य सुनिल पंडित


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post