ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनतर्फ अरुणोदय गोशाळा येथे चारा वाटप

अरुणोदय गोशाळा येथे चारा वाटप
सण, उत्सव व वाढदिवसाबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासावी : राजेंद्र बलदोटा
नगर : सण, उत्सव, वाढदिवस साजरे करीत असताना प्रत्येकाने सकारात्मक
दृष्टीकोनातून सामाजित बांधिलकी जोपासली पाहिजे. केमिस्ट असोसिएशकडून वर्षभर विविध
सामाजिक उपक्रम राबविले जातात. ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष 
अप्पासाहेब उर्फ जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा व शहर केमिस्ट
असोसिएशनच्यावतीने अरुणोदय गोशाळा येथे चारा वाटप करण्यात आले. केमिस्ट
असोसिएशनच्या सदस्यांनी पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्याचे ठरविले
आहे. त्या माध्यमातून विविध ठिकाणी वृक्षांची लागवड केली. याचबरोबर प्रत्येक नागरिकाने
आपल्या संस्कृतीचे जनत करावे, असे प्रतिपादन जिल्हा सेक्रेटरी राजेंद्र बलदोटा यांनी केले

ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मा. आ. अप्पासाहेब उर्फ जगन्नाथ शिंदे
यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा व शहर केमिस्ट असोसिएशनच्यावतीने अरुणोदय गोशाळा येथे
चारा वाटप करताना जिल्हा सेक्रेटरी राजेंद्र बलदोटा, कार्याध्यक्ष राजेंद्र बेंद्रे, विलास शिंदे, नितीन
बोठे, संजय गुगळे, अविनाश साळुंके, अशोक बलदोटा, कमलेश गुंदेचा, अभय मुथा, अमित
धोका, परेश खराडे, रामदास गायकवाड, सागर खाकाळ, जगदीश रामदीन, सुनील
बांगर, शैलेश पुंड, अनिल गांधी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राजेंद्र बेंद्रे म्हणाले की, नगर जिल्ह्यामध्ये जेव्हा जेव्हा दुष्काळ पडला,
तेव्हा तेव्हा केमिस्ट असोसिएशनचे सदस्य पुढे येऊन शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केले आहे.
यामध्ये शेतकऱ्यांना पाणी साठवून ठेवण्यासाठी जिल्हाभर पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात
आले. तसेच जनावरांना चारा देण्याचे काम केले आहे. कोरोना संसर्ग विषाणुच्या काळामध्येही
मोलाची कामगिरी पार पाडली. अप्पासाहेब शिंदे यांनी नेहमीच समाजाबद्दल सामाजिक बांधिलकी
जोपासण्याचे काम करीत असल्यामुळे केमिस्ट असोसिएशनचे सदस्यही त्यांच्या पावला पाऊल
ठेऊन सामाजिक उपक्रम राबवून आपण समाजासाठी काही देणे लागतो, या भावनेतून समाज
उपक्रम नियमितपणे राबवत असतात, असे ते यावेळी म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post