लोकमाता अहिल्यादेवी होळकर पतसंस्थेचा कारभार पारदर्शक - माजी मंत्री राम शिंदे

 लोकमाता अहिल्यादेवी होळकर पतसंस्थेचा कारभार पारदर्शक - माजी मंत्री राम शिंदे

चौंडी - श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील लोकमाता अहिल्यादेवी होळकर सहकारी पतसंस्थेचा कारभार पारदर्शक असून, नुकत्याच  दिपावलीच्या निमित्ताने सभासदांना 8 टक्के दराने लाभांष आणि कर्मचार्यांना दोन महिन्यांचा पगार बोनस म्हणून दिला. निश्चितच जिल्ह्यातील विश्वासू पतसंस्थेमध्ये या पतसंस्थेचा समवेश होतो. भविष्यात या पतसंस्थेने जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाखा सुरु करुन पतसंस्था चळवळीचे नेतृत्व करावे, असे प्रतिपादन माजी मंत्री राम शिंदे यांनी केले.

चौंडी येथील माजी मंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानी पतसंस्थेच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव राशिनकर, उपाध्यक्ष महेश ओहोळ, संचालक प्रविण काळे, विनोद जोशी, अशोक प्रधान, शरद बेहळे, ज्ञानेश्वर ओहोळ, विजय भगत, संदिप सोनवणे, रंजना बोरुडे, व्यवस्थापक बबलू पिंजारी आदि उपस्थित होते.

याबाबत अशोकराव राशिनकर यांनी सांगितले की, संस्थेला गतवर्षी 6 लाख 10 हजारांचा निव्वळ नफा झाला असून, संस्थेने 6 कोटी 60 लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. तसेच संस्थेकडे 9 कोटी रुपयांच्या ठेवी जमा असून, संस्थेने 2 कोटी 90 लाख रुपयांची बँक गुंतवणूक केली आहे. 

------

फोटो - चौंडी येथील माजी मंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानी पतसंस्थेच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव राशिनकर, उपाध्यक्ष महेश ओहोळ, संचालक प्रविण काळे, विनोद जोशी, अशोक प्रधान, शरद बेहळे, ज्ञानेश्वर ओहोळ, विजय भगत, संदिप सोनवणे, रंजना बोरुडे, व्यवस्थापक बबलू पिंजारी आदि 



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post