महात्मा फुले समता परिषदेच्या कोपरगांव तालुका उपाध्यक्षपदी रमेश टिक्कल
नगर - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कोरगांव तालुका उपाध्यक्षपदी रमेश सयाजीराव टिक्कल यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड यांनी दिले. यावेळी प्रांतिक सदस्य पद्मकांत कुदळे, कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, तालुकाध्यक्ष संतोष वडणे, शहराध्यक्ष विशाल राऊत आदि मान्यवर उपस्थित होते.
श्री.रमेश टिक्कल हे अखिल भारतीय क्षत्रिय धनगर समाज संघटनेचे राज्य सचिव, आनंदनगर बहुउद्देशिय संस्थेचे संस्थापक सचिव तसेच अपंग शाळेतील कर्मचारी संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. रमेश टिक्कल हे स्वत: अपंग शाळेतील शिक्षक असून, अनेक समाजभिमुख कामांमध्ये त्यांचा सहभाग असतो. यासर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मंत्री ना.छगनराव भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या पश्चिम महाराष्ट्राच्या बैठकीमध्ये कोपरगांव तालुक्यातील अनेक मान्यवरांनी रमेश टिक्कल यांच्यावर जबाबदारी देण्याचे सूचविले. त्यानुसार त्यांची निवड करण्यात आली आहे.
रमेश टिक्कल यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री राम शिंदे, आ.महादेव जानकर, प्राचार्य सुधाकर दातीर, बीएसएनएलचे उप मंडल अभियंता वसंतराव दातीर आदि मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
--------
कृपया प्रसिद्धीसाठी
रमेश टिक्कल (मो.7875674706)
फोटो - महात्मा फुले समता परिषदेच्या कोरगांव तालुका उपाध्यक्षपदी रमेश सयाजीराव टिक्कल यांची नियुक्ती करुन पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड यांनी पत्र दिले. यावेळी प्रांतिक सदस्य पद्मकांत कुदळे, कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, तालुकाध्यक्ष संतोष वडणे, शहराध्यक्ष विशाल राऊत आदि.

Post a Comment