प्रगतिशील लेखक संघाच्या प्रदेश सह सचिवपदी प्रा शर्मिला गोसावी


 प्रगतिशील लेखक संघाच्या प्रदेश सह सचिवपदी प्रा शर्मिला गोसावी


अहमदनगर : अखिल भारतीय स्थरावर पुरोगामी विचारांच्या लेखक,विचारवंताची चळवळ असलेल्या प्रोग्रेसिव्ह रायटर असोसिएशन च्या महाराष्ट्रातील शाखा असलेल्या प्रगतिशील लेखक संघ,महाराष्ट्र राज्य ची कार्यकारणी नुकतीच तयार झालेली असुन त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कवयित्री प्रा.शर्मिला गोसावी यांची सह सचिव म्हणून निवड झाली आहे,सविस्तर कार्यकारणी पुढीलप्रमाणे:    अध्यक्ष    : प्रा.डॉ.नागनाथ कोतापल्ले,       कार्यकारी अध्यक्ष : डॉ.जी.के.ऐनापुरे. महासचिव    : प्रा.राकेश वानखेडे    उपाध्यक्ष   :  प्रसेनजीत तेलंग प्रा.डॉ. सुधाकर शेंडगे  कॉ.तानाजी ठोंबरे सहसचिव   : प्रा.डॉ.समाधान इंगळे, शर्मिला गोसावी, संघटक   : प्रभू राजगडकर, प्रा.डॉ.मिलिंद कसबे,डॉ.प्रवीण बनसोड,डॉ.शबाना खान , संदीप पवार      वर्किंग कमिटी सदस्य :डॉ.श्रीधर पवार, डॉ.महेंद्र कदम, डॉ.राजेंद्र मुंडे, सुशील लाड,  चारूल जोशी, प्रसेनजित गायकवाड, नरेंद्र लांजेवार, प्रमोदकुमार अणेराव, वीरा राठोड, प्राचार्य काशिनाथ ब-हाटे, डॉ.युगुल रायलू, दयानदं कनकदंडे, डॉ.कैलास अंभोरे,राजकुमार कदम,मोहन शिरसाठ,मारुती शिरतोंडे,डॉ.दत्ता घोलप,प्रमोद अहिरे,प्रल्हाद पवार, सुनील गोसावी,राजू चिमणकर, साईराज उके,सतीश लोखंडे,नंदुकुमार हत्तीकार,गिरीश फौंडे,सुरेश साबळे,दत्ता चव्हाण

अहमदनगर येथील शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या कार्यकारणी सदस्या असलेल्या प्रा.शर्मिला गोसावी यांचे बांगड्याची खैरात,नजराणा, मनमित इ पुस्तकं प्रसिद्ध असुन 6 प्रतिनिधीक काव्यसंग्रहाचे संपादन त्यांनी केले आहे,

आकाशवाणी वर त्यांचे सात वेळा काव्यवाचन झाले असुन विविध कार्यक्रमांचे निवेदन ,सुत्रसंचालन त्या करतात,मराठी,हिंदी,इंग्रजी व उर्दु भाषेतून त्या लेखन करतात.

       नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचे आमदार कविवर्य लहू कानडे,प्राचार्य शिवाजीराव देवढे,कविवर्य चंद्रकांत पालवे व शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी अभिनंदन केले आहे.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - 

कृपया वरील वृत्तास आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्धी द्यावी,हि विनंती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post