जिवा सेना संघटनेने केला महिलांचा सन्मान सोहळा

 जिवा सेना संघटनेने केला महिलांचा सन्मान सोहळा


आपण सक्षम आहोत या आत्मविश्‍वासाने महिलांचे सक्षमीकरण बळकट होईल - योगेश पिंपळे


     नगर - सर्व क्षेत्रातील असमानता झुगारुन समानता प्राप्त करु शकतील असे सामर्थ्य महिलांमध्ये असते. आपण सक्षम आहोत, या आत्मविश्‍वासाने महिलांचे सक्षमीकरण बळकट होईल, असे प्रतिपादन जिवा सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पिंपळे यांनी केले.


     साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान व जिवा सेना संघटनेने नगर जिल्ह्यात व शहरात महिलांसाठी सबलीकरण, सक्षमीकरण,  सशक्तीकरणाचे कार्य करणार्‍या महिलांचा सन्मान सोहळा नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री.पिंपळे यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.


     या सन्मान सोहळ्यात नगर तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षपदी वनिता बिडवे यांची निवड झाल्याबद्दल श्री.त्र्यंबके यांच्या हस्ते त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी स्वाती पवळे, सीमा त्र्यंबके, रेश्मा पवने, वंदना दडगे, अनिल निकम, माऊली गायकवाड, रमेश बिडवे, आशिष ताकपिरे, संदिप सोनवणे आदि उपस्थित होते.


     श्री.पिंपळे पुढे म्हणाले, दैनंदिन जीवनात महिला विविध भुमिका पार पाडत आहे. समाजाच्या त्या आधारस्तंभ आहेत. कधी वात्सल्यपूर्ण माता तर कधी सक्षम सहचारिणी अशी विविध नाती कुशलतेने आणि कोमलतेने निभावतात वनिताताईंनी जनआरोग्य फौंडेशनच्या माध्यमातून रुग्णसेवा करुन, सर्वसामान्यांना आधार दिला. जिवा सेनेच्या माध्यमातून सर्व समाजातील महिलांना विविध माध्यमातून आत्मसन्मान मिळवून दिला आणि आता राष्ट्रवादी पक्षाच्या त्या नगर तालुकाध्यक्ष झाल्याने त्यांचे पक्षवाढीसाठी मोठे योगदान मिळेल, अशी अपेक्षा पिंपळे यांनी व्यक्त केली.


     नगरसेवक त्र्यंबके यांनी महिलांच्या कार्याचा गौरव करुन राष्ट्रवादी पक्षामुळे 33 टक्के आरक्षण महिलांना मिळाले, त्याचा फायदा सर्व स्तरावर झाला असल्याचे सांगितले.


     यावेळी वनिता बिडवे यांनी सन्मान सोहळ्यात केलेला सत्कार आमच्या कामाला पाठबळ देईल. महिलांच्या प्रत्येक प्रश्‍नात संघटना, पक्षाच्या माध्यमातून लक्ष घालू तसेच श्री साई-संघर्ष प्रतिष्ठान व जिवा सेना संघटनेने आम्हाला मान व सन्मान दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


     सूत्रसंचालन आशिष ताकपिरे यांनी केले तर संदिप सोनवणे यांनी आभार मानले.


--------


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post