माय स्टॅम्प (माझे तिकिट) नवीन संकल्पना
प्रत्येकाला आपला फोटो वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेत रहावा, असे वाटत असते. त्यासाठीच पोस्ट खात्याने माय स्टॅम्प (माझे तिकिट) ही नवीन योजना भारतीय डाक सेवेने सुरु केली आहे. डाकसेवेच्या तिकिटावर राष्ट्रीय नेते, पक्षी, प्राणी यांचे चित्र असते. मात्र भारतरत्न सचिन तेंडूलकर वगळता जिवंतपणी कुठल्याही व्यक्तीच्या तिकिटावर प्रतिमा मुद्रीत करण्यात आलेली नाही. यावर्षी भारत सरकारच्या माय स्टॅम्प योजने अंतर्गत अहमदनगर प्रेस क्लबचे कार्यकारिणी सदस्य निशांत दातीर, संध्या मेढे, ऋतुजा दिवटे, महेश रांछ यांची प्रतिमा असलेले तिकिट त्यांना देण्यात आले.

Post a Comment