डॉ.सुनिल पोखरणा यांचा लक्ष्मी कारंजा परिसराच्यावतीने सत्कार
सर्वांच्या सहकार्याने नगरमध्ये
कोरोना रोखण्यात यश
- विक्रम
राठोड
नगर
- कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्व
जगभर थैमान घातल्याने गेल्या
सहा महिन्यांपासून महाराष्ट्रसह
नगरमध्येही अनेक रुग्ण बाधित
झाले. या बाधित रुग्णांवर
योग्य ते उपचार करुन
त्यांना बरे करण्याचे काम
जिल्हा रुग्णालयाच्यावतीने करण्यात
आले.
या काळात अनेक गोर-गरीबांना
जिल्हा रुग्णालयाचा मोठा
आधार मिळाला. या कालावधीत
डॉ.सुनिल
पोखरणा यांनी जिल्हा रुग्णालयाची
जबाबदारी चांगल्यापद्धतीने सांभाळून
रुग्णसेवेचे व्रत जपले. त्यांच्या या
चांगल्या कामामुळे व
गोर-गरीबांच्या
आशिर्वादाने त्यांची पदोन्नत्ती होऊन
ते जिल्हा शल्य चिकित्सक
झाले ही आपल्या सर्वांच्यादृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. लक्ष्मी
कारंजा परिसरातील नागरिकांनी
त्यांचा सत्कार करुन त्यांच्या
कामाचे कौतुक केले. ही त्यांच्या
कामाची पावती आहे. डॉ.सुनिल पोखरणा
व त्यांच्या टिमसह सामाजिक
संस्थांच्या सहकार्याने आज
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी
होत ही नगरकरांना दिलासा
देणारी बाब आहे, असे प्रतिपादन
युवासेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम
राठोड यांनी केले.
लक्ष्मी कारंजा परिसरातील नागरिकांच्यावतीने जिल्हा शल्य चिकित्सकपदी
डॉ.सुनिल
पोखरणा यांची नियुक्ती झाल्याबद्दल
सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विक्रम
राठोड, शशिकांत देशमुख, पिंटू ढोणे, संतोष
गोयल, बंटी भागानगरे, सुजय भंडारे, रविंद्र
निफाडकर, किशोर देशमुख, प्रथमेश देशमुख, प्रतिक
बोगावत, राजू औटी, मच्छिंद्र दळवी, सुमित
धेंड, उपेंद्र टोकेकर, किरण देशमुख, सुरज
राऊत, अनिल पुंड, सुहास पाथरकर, मिलिंद
घोरपडे, संजय कोठारी, राजेंद्र जोग, संतोष
जाधव, संदिप दिवटे आदि
उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देतांना डॉ.सुनिल
पोखरणा म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक नागरिकांचे आरोग्य
धोक्यात आले, या काळात
जिल्हा रुग्णालयाच्यावतीने नागरिकांची
योग्य ती काळजी घेतल्याने
नगरमध्ये कोरोना आटोक्यात आला
आहे.
सामाजिक संस्था व नागरिकांच्या
सहकार्याने लवकरच कोरोनावर आपण
मात करु. अजुन धोका
कायम असल्याने नागरिकांनीही
काळजी घेतली पाहिजे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टसिंग
यासह शासनाच्यावतीने देण्यात
येणार सूचनांचे पालन
केले पाहिजे. आज परिसराच्यावतीने जो सत्कार केला, तो
माझ्या घरचा सत्कार आहे. यामुळे
पुढील काळात मला काम
करण्यास प्रेरणा मिळणार असल्याचे
त्यांनी सांगितले.
प्रास्तविकात शशिकांत देशमुख यांनी
परिसरातील नागरिक व व्यावसायिक
यांच्यावतीने नेहमीच विविध उपक्रम
राबविले जात असतात. या भागातील
रहिवासी डॉ.सुनिल पोखरणा
यांची जिल्हा शल्य चिकित्सकपदी
झालेली निवड अभिमानास्पद आहे, असे
सांगून सर्वांचे आभार
मानले.
-------
कृपया प्रसिद्धीसाठी आपला
फोटो - लक्ष्मी कारंजा परिसरातील
नागरिकांच्यावतीने जिल्हा शल्य
चिकित्सकपदी डॉ.सुनिल पोखरणा
यांची नियुक्ती झाल्याबद्दल
सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विक्रम
राठोड, शशिकांत देशमुख, पिंटू ढोणे, संतोष
गोयल, बंटी भागानगरे, सुजय भंडारे, रविंद्र
निफाडकर, किशोर देशमुख, प्रथमेश देशमुख
आदि.
(छाया : राजु खरपुडे)
Post a Comment